व्यसनमुक्तीच्या उपचारास घेऊन जात असल्याच्या रागातून चाकूने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:33 IST2019-09-25T18:28:55+5:302019-09-25T18:33:07+5:30
आरोपीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी घेऊन जात होते...

व्यसनमुक्तीच्या उपचारास घेऊन जात असल्याच्या रागातून चाकूने हल्ला
पिंपरी : भाच्याला व्यसनमुक्त करण्यासाठी त्याच्यावर उपचार करण्याचे ठरले. मात्र उपचारासाठी तो तयार झाला नाही. तरीही त्याला रुग्णालयात घेऊन जात असल्याने राग आल्याने त्याने चाकूने हल्ला करून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कासारवाडी येथे रविवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा परम विश्वकर्मा (वय ३०, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. परम भोटे विश्वकर्मा (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तर लालबहादूर भोंटे असे आरोपीचे नाव आहे. फियार्दी दीपा व जखमी परम पतीपत्नी आहेत. तर आरोपी लालबहादूर हा फिर्यादी दीपा यांचा भाचा आहे.
फिर्यादी दीपा व त्यांचे पती परम हे दोघे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी लालबहादूर याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी घेऊन जात होते. त्यासाठी लालबहादूर तयार नव्हता. त्यामुळे त्याचा त्याला राग आला. त्यातून त्याने कासारवाडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर परम विश्वकर्मा यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत..