एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला;  रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अल्पवयीन तरूणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 18:43 IST2021-03-10T18:40:59+5:302021-03-10T18:43:01+5:30

Knife attack dut to one-sided love : पवनी तालुक्यातील घटना : हातावर आणि मानेवर चाकूने वार, आरोपीस अटक

Knife attack from one-sided love; The young woman was covered in blood | एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला;  रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अल्पवयीन तरूणी

एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला;  रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अल्पवयीन तरूणी

ठळक मुद्देदलीराम जयदास पचारे (३०) रा. नेरला ता. पवनी असे आरोपी तरूणाचे नाव आहे. 

अड्याळ (भंडारा) : एकतर्फीप्रेमातून एका अल्पवयीन तरूणीवर चाकूने सपासप वार करण्याची घटना पवनी तालुक्यातील नेरला येथील उपसा सिंचन योजनेजवळ मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. अड्याळ पोलिसांनी बुधवारी पहाटे हल्लेखोर तरूणाला अटक केली. या घटनेने पवनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दलीराम जयदास पचारे (३०) रा. नेरला ता. पवनी असे आरोपी तरूणाचे नाव आहे. गावातीलच एका तरूणीवर तो एकतर्फी प्रेम करीत होता. मंगळवारी रात्री सदर अल्पवयीन तरूणी दुचाकीवर बसून जात असल्याचे त्याला दिसले. गावानजीकच्या नेरला उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयाजवळ तिच्या दुचाकीला दलीरामने धडक दिली. त्यात ती खाली कोसळली. तिचे केस पकडून तु माझी होणार नशील तर मी तुला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. काही वेळातच त्याने आपल्या जवळील चाकू काढून सदर तरूणीच्या हातावर, मानेवर आणि छातीवर सपासप वार केले. तिला घटनास्थळावर सोडून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीला गावरकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान अड्याळ पोलीस ठत्तण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा रात्रभर शोध घेतला असता पहाटे त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Knife attack from one-sided love; The young woman was covered in blood