पिंपरी : पूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या परंतू काही महिन्यांपासून विभक्त झालेल्या तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या हाताची नस कापली. तसेच स्वत:च्या हाताची नस कापुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी नखातेवस्ती रहाटणी येथे घडली. सांगवी पोलिसांनी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिर उर्फ रामपीर इम्तियाज मुन्सी (वय २९,रा. नखातेवस्ती, मुळचे नालासोपारा येथील रहिवासी) असे आरोपीचे नाव आहे. २६ वर्षीय तरूणीने आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली असून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. २० १६ पासून पीडित तरूणी आणि आरोपी यांची ओळख आहे. एक वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्रित राहत होते. त्यांच्यात मतदभेद झाल्याने काही महिन्यांपासून ते विभक्त राहत होते. गेल्या काही दिवसांपासून तरूणीला लग्न करण्याचा आग्रह तरूण करीत होता. यावरून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. सोमवारी सायंकाळी अमिर हातात चाकू घेऊन आला. तरूणी राहत असलेल्या रहाटणी, नखातेनगर येथे जाऊन त्याने रागाच्या भरात चाकुने तरूणीच्या हाताची नस कापली. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने स्वत:च्या हाताची नस कापुन आत्महत्येचाही प्रयत्न केला. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपीविरोधात तरूणीला जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकू हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 13:48 IST
एक वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्रित राहत होते. त्यांच्यात मतदभेद झाल्याने काही महिन्यांपासून ते विभक्त राहत होते.
पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकू हल्ला
ठळक मुद्दे२६ वर्षीय तरूणीकडून आरोपीविरोधात फिर्याद दाखल जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल