Murder Case : डोक्यावर वार करून तरुणाची हत्या, आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 21:58 IST2021-12-21T21:57:17+5:302021-12-21T21:58:29+5:30
Murder Case : खुनाचे कारण अद्याप समजले नाही

Murder Case : डोक्यावर वार करून तरुणाची हत्या, आरोपी फरार
पुणे : केंदूर (ता. शिरूर) हद्दीतील पऱ्हाडवाडी येथे एका तरुणाचा डोक्यात मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. निलेश उर्फ पप्पू विष्णू पऱ्हाड (वय ३५ रा. पऱ्हाडवाडी) असे हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण समजले नसून हल्ल्यानंतर आरोपी फरार आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पऱ्हाडवाडी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक राहुल धस, वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. 'अगोदर आरोपींना हजर करा, तेव्हाच मृतदेह शवविच्छेदनाला देऊ' अशी भूमिका मृत तरुणांच्या नातेवाईकांनी घेतली होती.
संबंधित आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास अटक केले जाईल, अशी ग्वाही देऊन नातेवाईकांची समजून काढल्यानंतर मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान आरोपीच्या शोधार्थ दोन विशेष पथके रावना करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.