'प्रेयसीला मारलं, आता बायकोची वेळ', फेसबुक लाईव्ह करत केल्या हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 21:35 IST2021-12-14T21:35:18+5:302021-12-14T21:35:55+5:30
Double Murder and Suicide : 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, बाल्टिमोरचा रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय राजेई ब्लैक याने शनिवारी गरोदर असलेल्या त्याच्या प्रेयसीची आणि नंतर त्याच्या माजी पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली.

'प्रेयसीला मारलं, आता बायकोची वेळ', फेसबुक लाईव्ह करत केल्या हत्या
अमेरिकेत एका व्यक्तीने फेसबुक लाईव्हवर रक्तरंजित घटना घडवली. त्याने आधी त्याच्या प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारले. नंतर त्याच्या पत्नीच्या घरी जाऊन तिचीही हत्या केली. शेवटी त्याने स्वतःचा जीवही संपवला. यादरम्यान तो संपूर्ण वेळ फेसबुकवर लाईव्ह करत होता.
'डेली मेल'च्या वृत्तानुसार, बाल्टिमोरचा रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय राजेई ब्लैक याने शनिवारी गरोदर असलेल्या त्याच्या प्रेयसीची आणि नंतर त्याच्या माजी पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. ही घटना घडण्यापूर्वी तो फेसबुकवर लाइव्ह आला होता, ज्यामध्ये त्याने ही हत्या कशी करणार आहे, हे सांगितले.
फेसबुक लाइव्ह दरम्यान, राजेई ब्लैक म्हणाला, 'मी नुकतेच माझ्या प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडली, ते एका स्वप्नासारखे वाटले. आता पुढचा नंबर माझ्या पत्नीचा आहे आणि मग मी सुद्धा आत्महत्या करणार आहे. असे सांगितल्यानंतर, राजेई ब्लैकची पत्नी वेंडी राजेई ब्लैकच्या घरी पोहोचतो, वेंडीने दरवाजा उघडताच राजेई ब्लैकने तिला गोळ्या घालून ठार केले. काही वेळाने त्याने स्वत:वरही गोळी झाडली.
खुनामागे परस्पर वाद!
घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वेंडीच्या घरातून तिचा आणि राजेई ब्लैकचा मृतदेह सापडला. व्हिडिओच्या आधारे जेव्हा ती राजेई ब्लैकची प्रेयसी तारा लबांग हिच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे तिचा मृतदेह आढळून आला. ताराच्या डोक्यात गोळी लागली.
राजेई ब्लैक, वेंडी आणि तारा या तिघेही रुग्णालयात काम करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वी राजेई ब्लैक यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्याला दुसरी नोकरी मिळत नव्हती. तो खूप डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यांच्या दोन्ही मुलांच्या ताब्याबाबतही वाद झाला होता. या सगळ्यात असतानाच त्यांनी ही भयानक घटना घडवली. त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हेही दाखल आहेत.