तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:27 IST2025-08-04T14:25:13+5:302025-08-04T14:27:45+5:30

एका व्यक्तीने तिसऱ्या बाईसाठी आपल्या दुसऱ्या पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Killed second wife for love of third woman; Husband planned, brutal act committed in front of infant | तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

प्रेमाच्या नावाखाली विकृती आणि गुन्हेगारी सतत वाढताना दिसत आहे. पती-पत्नीच एकमेकांचा जीव घेत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहे. आता उत्तरखंडच्या कुशीनगरमधून एक अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने तिसऱ्या बाईसाठी आपल्या दुसऱ्या पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तिसऱ्या पत्नीच्या हव्यासापोटी एका पुरूषाने दुसऱ्या पत्नीची हत्या केली. यासाठी त्याने सुपारी दिली होती. त्याने आपल्याच पत्नीच्या हत्येची योजना अशी आखली की, सुरुवातीला पोलिसही गोंधळले. पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही चतुर असला, तरी तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही. असेच काहीसे या प्रकरणात घडले आहे.

ही घटना हाता कोतवाली परिसरातील बधिया बुजुर्ग गावात घडली.  या गावात ३० जुलै रोजी २५ वर्षांच्या रंभा या महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह एका बंद खोलीत आढळला. महिलेची तिच्या एक वर्षाच्या निष्पाप मुलासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. पण, तिच्या खोलीत कोणतीही तोडफोड केली गेली नव्हती, कोणतेही खेचखेच झाल्याचा पुरावा नव्हता. पोलिसांसाठी हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होते. या घरात रंभा तिची भाची आणि लहान मुलासह राहत होती. रंभाचे हे दुसरे लग्न होते. त्यामुळे संशयाची सुई प्रथम सासरच्या आणि पहिल्या पत्नीच्या कुटुंबाकडे गेली. परंतु पोलिसांना काहीही ठोस पुरावे सापडले नाही.

पोलिसांनी पतीच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली अन्.. 
तपास पुढे सरकत असताना पोलिसांनी मृत महिलेचा आणि तिच्या पती गोविंद कुमारच्या मोबाईलचा सीडीआर तपासला. आणि इथेच एक मोठे रहस्य उघड झाले. सीडीआरमध्ये गोविंद सतत तिसऱ्या महिलेशी बोलत होता. पूजा यादव नावाची ही महिला असून, गोविंदने आधीच तिच्याशी तिसरे लग्न केले होते.

चौकशीदरम्यान गुन्हा केला कबूल 
चौकशीदरम्यान गोविंदने कबूल केले की, त्याने रंभाला संपवण्यासाठी मणिपूरमधील त्याच्या कामगाराला, मनीष कुमार गुप्ता याला ५ लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. दोघांच्या योजनेनुसार, ३० जुलै रोजी मनीष रंभाकडे गेला. प्रथम त्याने तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला, नंतर संधी साधून त्याने खोलीत ठेवलेल्या लोखंडी रॉडने डोक्यावर मारून तिला बेशुद्ध केले आणि नंतर तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून खून केला. ही हृदयद्रावक घटना तिच्या एक वर्षाच्या चिमुकल्या बाळासमोर घडली. 

दोन्ही आरोपींना अटक
पोलिसांनी गोविंद आणि मनीष यांना अटक केली आहे. त्यांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केले आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Killed second wife for love of third woman; Husband planned, brutal act committed in front of infant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.