उंदराला पाण्यात बुडवून मारले, पोलिसांकडून तरुणाची १० तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 11:47 IST2022-11-27T11:47:27+5:302022-11-27T11:47:59+5:30

त्यानंतर पशूंवरील क्रूरता अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली

Killed a rat by drowning it in water, the youth was interrogated for 10 hours by the police | उंदराला पाण्यात बुडवून मारले, पोलिसांकडून तरुणाची १० तास चौकशी

उंदराला पाण्यात बुडवून मारले, पोलिसांकडून तरुणाची १० तास चौकशी

लखनौ : पाण्यात बुडवून एका उंदराला मारल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याची दहा तास चौकशीही केली. ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील बदायूंची. 

त्यानंतर पशूंवरील क्रूरता अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली. पशू क्रूरतेशी संबंधित प्रकरण असल्याने पोस्टमार्टम आवश्यक आहे. याचा खर्च तक्रारदार पशुप्रेमी विकेंद्र सिंह यांनी केला. ॲम्बुलन्स नव्हती तर त्यांनी मृत उंदराला जवळपास ५० किमी दूर बदायूं ते बरेली पाठविण्यासाठी एसी कारचे भाडे १५०० रुपये दिले. पोस्टमार्टमसाठी २२५ रुपये शुल्क भरले. 

Web Title: Killed a rat by drowning it in water, the youth was interrogated for 10 hours by the police