चिमुकलीचा गळा आवळून आईने घेतला गळफास; हिंगणघाट येथील समाजमन सुन्न करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 21:10 IST2021-09-30T21:05:24+5:302021-09-30T21:10:50+5:30
Murder And Suicide : या घटनेने हिंगणघाट वासियांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून समाजमन सुन्न पडले.

चिमुकलीचा गळा आवळून आईने घेतला गळफास; हिंगणघाट येथील समाजमन सुन्न करणारी घटना
ठळक मुद्देकविता मोहदुरे (३५) तर आराध्या मोहदुरे असे अडीच वर्षीय चिमुकलीचे नाव आहे.
वर्धा : अडीच वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून तिची हत्या करीत आईने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना हिंगणघाट येथील आशिष नगर विठ्ठल वॉर्ड परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली असून सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने हिंगणघाट वासियांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून समाजमन सुन्न पडले. कविता मोहदुरे (३५) तर आराध्या मोहदुरे असे अडीच वर्षीय चिमुकलीचे नाव आहे.
पैसे पुरवणारा एटीएसच्या रडारवर; वांद्र्यातून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात https://t.co/Nn8agNXHtA
— Lokmat (@MiLOKMAT) September 30, 2021