पेपर देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलेचे अपहरण, वडीलांनी रिक्षात बसविलेली लेक घरी परतलीच नाही; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 19:18 IST2023-03-18T19:18:45+5:302023-03-18T19:18:59+5:30
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेपर देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलेचे अपहरण, वडीलांनी रिक्षात बसविलेली लेक घरी परतलीच नाही; गुन्हा दाखल
कुंदन पाटील -
जळगाव : बेंडाळे महाविद्यालयात पेपर देण्यासाठी निघालेल्या १६ वर्षीय मुलीचे अज्ञात युवकाने आमीष दाखवत अपहरण केल्याची घठना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.१७ मार्च रोजी सकाळी १ वाजता उषा (नाव बदललेले) ही बेंडाळे महाविद्यालयात पेपर देण्यासाठी घरुन निघाली. अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या उषाला तिच्या पालकांनी हॉटेल कस्तुरीजवळ रिक्षात बसविले. त्यानंतर ती बेंडाळे महाविद्यालायकडे निघाली. त्यानंतर उषा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने तिचा शोध सुरु झाला. तिच्याविषयी विचारपूस केल्यावर आमीष दाखवून कुणीतरी तिचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उषाच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्याठिकाणी कैफियत मांडली. त्यानुसार अज्ञात युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहेत.