शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

खळबळजनक! भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचा बीएमडब्ल्यू गाडीत सापडला मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 4:29 PM

अत्रे हे अत्रेनेट इंक या डिजीटल कंपनीचे मालक होते.

ठळक मुद्देअत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अपहरणाआधी अत्रे यांनी घराचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.वॉशिंग्टनच्या सॅन्टा क्रूझ येथील राहत्या घरून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन - भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक तज्ज्ञ तुषार अत्रे (५०) यांची वॉशिंग्टनच्या सॅन्टा क्रूझ येथील राहत्या घरून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. अत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अत्रे हे अत्रेनेट इंक या डिजीटल कंपनीचे मालक होते.अत्रे यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते. अत्रे यांच्या राहत्या घरापासून १० मैल अंतरावर सापडलेल्या बीएमडब्ल्यू गाडीत मृतदेह आढळून आला. मंगळवारी (१ ऑक्टोबर) सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी अत्रे यांना त्यांच्या घरात घुसून पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून पळवून नेले होते. या प्रकरणात अनेक संशयित असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तुषार अत्रे यांच्या हत्येत कोणाचा हात असल्याचे अजूनही निश्चित झाले नाही. मात्र, दरोड्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. ५० वर्षीय तुषार यांची यात्रेनेत इंक ही कंपनी सिलीकॉन व्हॅलीमध्ये होती. तुषार हे भारतीय वंशाचे कोट्यधीश उद्योजक होते. अपहरणाआधी अत्रे यांनी घराचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

टॅग्स :KidnappingअपहरणMurderखूनPoliceपोलिसbusinessव्यवसायIndiaभारतAmericaअमेरिकाBmwबीएमडब्ल्यू