नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 01:27 AM2020-12-07T01:27:32+5:302020-12-07T01:27:58+5:30

Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे नवीन पनवेल येथे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला मदत करणाऱ्या नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश येत आहे.

Khandeshwar police failed to arrest the corporator | नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश

नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश

Next

 नवीन पनवेल : बनावट कागदपत्रांच्या आधारे नवीन पनवेल येथे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला मदत करणाऱ्या नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश येत आहे. नगरसेवक बारा महिन्यांपासून फरार असल्याचे दाखविण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
१३ डिसेंबर, २०१९ रोजी नवीन पनवेल, सेक्टर ६ येथून २७ वर्षीय सोनाली अब्दुल खुद्दुस खान या बांगलादेशी महिलेला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती. या महिलेला एका नगरसेवकाने मदत केली होती. या महिलेकडे शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, रेशन कार्ड व इतर खोटी शासकीय कागदपत्रे सापडून आली होती. ही सर्व कागदपत्रे बीड येथील आहेत. एका नगरसेवकाच्या मदतीने ही सारी बनावट कागदपत्रे बनविले असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांना विचारले असता, आरोपीला अटक करण्यासाठी टीम पाठविली होती. मात्र, तो सापडला नाही, असे सांगितले.

Web Title: Khandeshwar police failed to arrest the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.