धक्कादायक! केरळमध्ये तरुणीला जिवंत जाळले, आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:38 IST2019-04-04T16:35:40+5:302019-04-04T16:38:34+5:30

केरळमधील थ्रिसूर येथे एका संशयित व्यक्तीने 22 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली.  

kerala thrissur college engineering student girl attack burned crime | धक्कादायक! केरळमध्ये तरुणीला जिवंत जाळले, आरोपी फरार

धक्कादायक! केरळमध्ये तरुणीला जिवंत जाळले, आरोपी फरार

थ्रिसूर : केरळमधील थ्रिसूर येथे एका संशयित व्यक्तीने 22 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय नितीश असे या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.  नितीश हा गेल्या काही दिवासांपासून 22 वर्षीय तरुणीच्या मागावर होता. बुधवारी नितीश हा तरुणीच्या घरात घुसला आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. या घटनेनंतर त्याने घरातून पळ काढला. यावेळी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे धावत आले. मात्र, तिचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

येथील स्थानिक आमदार के. राजन यांनी सांगितले की, तरुणीसोबत तिची आजी घरात होती. यावेळी आरोपी नितीश हा पाठीमागील दरवाज्यातून घरात आला. त्यानंतर त्याने अशा प्रकारचे धक्कादायक कृत्य केले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. गेल्या महिन्यात सुद्धा केरळमधील तिरुवल्लामध्ये एका युवकाने कॉलेजमधील तरुणीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.  

Web Title: kerala thrissur college engineering student girl attack burned crime