'रेपआधी त्याने गळ्यात बांधला होता पिवळा धागा', जामीनासाठी आरोपीने खेळली अजब खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:01 IST2021-12-06T17:59:53+5:302021-12-06T18:01:29+5:30
Kerala Rape Case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. ज्यानंतर २४ वर्षीय वैसाख विजयकुमारने जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता.

'रेपआधी त्याने गळ्यात बांधला होता पिवळा धागा', जामीनासाठी आरोपीने खेळली अजब खेळी
Kerala Rape Case : केरळमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. बलात्काराच्या एका घटनेत आरोपीने पिवळ्या धाग्याचा वापर केला. आऱोपी म्हणाला की, त्याने लॉजवर दुष्कर्म करण्याआधी महिलेच्या गळ्यात हा धागा बांधला होता. आरोपी म्हणाला की, त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं. अशात तो तिच्यासोबत वैवाहिक संबंधात होता. यावर कोर्ट म्हणालं की, हा लग्नाचा पुरावा नाही.
तेच पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. ज्यानंतर २४ वर्षीय वैसाख विजयकुमारने जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. पीडिता म्हणाली की, आरोपीने खोटं बोलून तिचं लैंगिक शोषण केलं. आरोपीने तिला लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. पीडिता हेही म्हणाली की, तिच्या मर्जीशिवाय तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं.
अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले की, पिवळा धागा बांधल्याने त्याला लग्न नाही म्हटलं जाऊ शकत. सहमतीशिवाय कुणासोबतही लैंगिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कारच म्हटला जातो. तेच याप्रकरणी पोलीस म्हणाले की, पिवळा धागा महिलेच्या गळ्यात बांधण्यात आला होता. विजयकुमारचा परिवार प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात आहे. पोलिसांनी हेही सांगितलं की, आरोपीने लग्नाचं आमिष दाखवत दोनदा महिलेचं लैंगिक शोषण केलं.
ही घटना २४ डिेसेंबर २०२० ची आहे. पीडितेने विजयसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. ज्यानंतर विजयकुमारने एक पिवळा धागा घेतला आणि तिच्यावर बलात्कार करण्याआधी तिच्या गळ्यात बांधला होता.