शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 3:42 PM

Kashmir Target Killing : सुरक्षा दलांनी त्याचा शोध मोहीम तीव्र केली होती. तेव्हा तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता.

बंगळुरू : जम्मू-काश्मीर पोलीस (Jammu kashmir police), कर्नाटक पोलीस (Karnataka Police) आणि भारतीय लष्कराच्या 17 राष्ट्रीय रायफल्सच्या पथकाने हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला बंगळुरू येथून अटक (Arrest)  केली आहे. ही कारवाई ५ जून रोजी झाली. तालिब हुसैन नावाच्या या दहशतवाद्याचा काश्मीर खोऱ्यात स्थलांतरित आणि हिंदूंच्या टार्गेट केलेल्या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिब हुसैन पत्नी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरमधून पळून गेला होता. सुरक्षा दलांनी त्याचा शोध मोहीम तीव्र केली होती. तेव्हा तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता.तालिबने येथील श्रीरामपुरा येथील मशिदीत आश्रय घेतला होता आणि तो शुक्रवारच्या नमाजच्या वेळी धार्मिक प्रवचन देत असे. बंगळुरूमध्ये दहशतवाद्याच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, "ही एक सतत प्रक्रिया आहे. लोकांच्या हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आहे. आमच्या पोलिसांनी मदत केली. यापूर्वी भटकळमध्येही अटक झाली होती. आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी बंगळुरूमध्ये अटक केली आहे. आमच्या पोलिसांनी त्यांना यात मदत केली आहे.अहवालानुसार, 5 जून रोजी पकडलेला दहशतवादी तालिब हुसैन हा जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यातील नागसेनी तहसीलमधील रासगवारीचा रहिवासी आहे. तो २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. सुरक्षा दलांच्या हिटलिस्टवर राहूनही तालिब सर्वाधिक काळ जिवंत राहिला. स्थानिक गुर्जर जमातीतील तालिब यांना डोंगरदऱ्यांची जाण आहे. याआधी सोमवारी जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग म्हणाले होते की, खोऱ्यात आतापर्यंत 47 दहशतवाद्यांचे मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी मंगळवारी एनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'राहुल भटच्या हत्येत दोन दहशतवादी सामील होते. त्यापैकी एकाचा खात्मा केला, तर एक शिल्लक आहे. अमरीन भट हत्या प्रकरणात २ दहशतवाद्यांची ओळख पटली होती. दोघांचाही मृत्यू झाला आहे. राजस्थानचे रहिवासी बँक कर्मचारी विजय कुमार बेनिवाल यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल. 

टॅग्स :ArrestअटकJammu Kashmirजम्मू-काश्मीरKarnatakकर्नाटकPoliceपोलिसHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनterroristदहशतवादी