डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 15:26 IST2025-06-29T15:26:32+5:302025-06-29T15:26:47+5:30

अवैध संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या.

Karnataka Crime News, wife killed her husband by pouring Spice on his eyes | डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या

AI Generated Image

Karnataka Crime:कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमकुरु येथे एका महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या विहिरीत फेकून दिला. पोलिसांना मृताच्या बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यावर शोध सुरू झाला. यादरम्यान मृताच्या घरात मिरची पावडर आणि झटापटीचे पुरावे आढळले. यानंतर संशयाची सुई पत्नीकडे वळाली. पोलिसांनी आपल्या पद्धतीने पत्नीची कसून चौकशी केली, त्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला.

डोळ्यात तिखट टाकून गळा आवळला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तिप्तूर तालुक्यातील कादशेट्टीहल्ली गावातील आहे. ५० वर्षीय शंकरमूर्ती असे मृताचे नाव असून, सुमंगल असे आरोपी पत्नीचे नाव आहे. महिलेचे नागराजू नावाच्या तरुणासोबत अवैध प्रेम संबंध होते. पतीला या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्याने विरोध केला. या विरोधामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुमंगलाने आधी पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली अन् त्याला लाकडी दांड्याने बेदम मारले. पती गंभीर जखमी झाल्यानंतर शेवटी त्याचा गळा पायाने दाबला, ज्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर सुमंगला हिने तिचा प्रियकर नागराजूसोबत मिळून मृतदेह एका पोत्यात भरला आणि सुमारे ३० किमी अंतरावरील विहिरीत फेकून दिला.  

पोलिस मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहोचले
शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या घरात मिरची पावडरचे डाग आणि संघर्षाच्या खुणा दिसल्या. यामुळे पोलिसांना पत्नीवर संशय आला. पोलिसांनी सुमंगलाचे कॉल डिटेल रेकॉर्ड काढले, तेव्हा संशय अधिकच वाढला. कॉल डिटेल्सद्वारे हा कट उघडकीस आला. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Karnataka Crime News, wife killed her husband by pouring Spice on his eyes