धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:35 IST2025-10-17T13:34:25+5:302025-10-17T13:35:20+5:30
इंजिनीअरिंग कॉलेजमधील ज्युनियर विद्यार्थ्याने आपल्या सीनियर विद्यार्थिनीला एकट्यात गाठलं!

धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
Karnatak Crime:कर्नाटकची राजधानी बंगळुरू बलात्काराच्या घटनेन हादरली आहे. शहरातील एका खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, एका ज्युनिअर विद्यार्थ्याने आपल्या सीनिअर विद्यार्थीनीवर हे अमानवीनय कृत्य केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, हनुमंथनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ज्युनियर विद्यार्थ्याने आपल्या सीनियर विद्यार्थिनीवर कॅम्पसच्या जेंट्स वॉशरुममध्ये बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून, आरोपी जीवन गौडा याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायिक कोठडीत पाठवले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी बी.टेकच्या सातव्या सेमिस्टरमध्ये शिकत असून, आरोपी त्याच कॉलेजचा ज्युनियर विद्यार्थी आहे. दोघांची ओळख सुमारे तीन महिन्यांपूर्वी झाली होती. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी जीवन गौडाने पीडितेला वारंवार फोन करुन आर्किटेक्चर ब्लॉकजवळ भेटण्यासाठी बोलावले. तरुणी तिथे पोहोचल्यावर आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने विरोध केल्यावर त्याने जबरदस्ती केली, तिला ओढत पुरुषांच्या वॉशरूममध्ये नेले आणि दुपारी 1:30 ते 1:50 या वेळेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडिता कसाबशी तेथून पळाली आणि थेट आपल्या मैत्रिनींना सगळी घटना सांगितली. त्यानंतर तिने आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. अखेर 15 ऑक्टोबर रोजी पीडितेच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल केला.
घटनेनंतर आरोपीचा कॉल
तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. घटनेनंतर आरोपीने पीडितेला फोन करुन निर्लज्जपणे "गर्भनिरोधक गोळी लागेल का?" असे विचारले. या कॉलमुळे पोलिसांना खात्री पटली की, आरोपीने केवळ शारीरिकच नव्हे, तर पीडितेचा मानसिक छळ केला. ज्या मजल्यावर ही घटना घडली, तेथे CCTV कॅमेरे नव्हते, त्यामुळे तपास अधिक कठीण झाला आहे. मात्र, फॉरेन्सिक टीम पुरावे तपासत असून, लवकरच सर्व सत्य समोर येईल. दरम्यान, या घटनेनंतर कॉलेजमधील विद्यार्थी प्रचंड आक्रोश व्यक्त करत आहेत.