"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:01 IST2025-12-19T12:00:12+5:302025-12-19T12:01:21+5:30
Digital Arrest: पोलीस अधिकारी असल्याचं खोटं सांगून लोकांना घाबरवणाऱ्या आणि पैसे उकळणाऱ्या एका सायबर गँगचा पर्दाफाश झाला आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलीस अधिकारी असल्याचं खोटं सांगून लोकांना घाबरवणाऱ्या आणि पैसे उकळणाऱ्या एका सायबर गँगचा पर्दाफाश झाला आहे. श्रावस्ती जिल्हयातील रहिवासी प्रमोद कुमार यांना आलेल्या एका धमकीच्या फोनमुळे या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख “कानपूरचे डीसीपी क्राईम” अशी करून दिली आणि सांगितलं की, प्रमोदच्या मोबाईल डेटाच्या तपासणीत तो आक्षेपार्ह व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद कुमारला एक फोन आला. समोरून कॉलर म्हणाला- "मी कानपूरचा डीसीपी क्राईम बोलत आहे. पोलिसांनी तुझ्या मोबाईल डेटाची तपासणी केली आहे. रेकॉर्डमध्ये तू घाणेरडे व्हिडीओ पाहत असल्याची पुष्टी झाली आहे. तुझ्यावर गुन्हा दाखल झाला असून आमची टीम तुझ्या घराकडे निघाली आहे. अटक टाळायची असेल तर ताबडतोब पैसे ट्रान्सफर कर." या धमकीमुळे घाबरलेल्या प्रमोदला सुरुवातीला हे सर्व खरं वाटलं, मात्र नंतर सत्य समोर येईपर्यंत त्याने आपले पैसे गमावले होते.
पाच आरोपींना अटक
या प्रकरणाची माहिती मिळताच कानपूर सायबर क्राईम पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. तपासाअंती असं समोर आलं की, एक संघटित गँग पोलीस अधिकारी बनून लोकांना फोन करत होती. क्राईम ब्रांचच्या पथकाने कारवाई करत दोन सख्या भावांसह एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी कानपूर देहातमधील जंगलात आणि शेतात बसून ही फसवणूक करत होते. या सर्वांना न्यायालयात हजर करून जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
भीतीपोटी पाठवले ४६ हजार
अतुल श्रीवास्तव यांनी सांगितलं की, प्रमोदला आलेला फोन हा कटाचा भाग होता. गुन्हेगारांनी त्याला जेलमध्ये पाठवण्याची भीती घातल्याने त्याने माफी मागितली. कारवाई थांबवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. प्रमोदने इतकी रक्कम नसल्याचं सांगितल्यावर, त्यांनी आहे तेवढी रक्कम पाठवण्यास सांगितलं. त्यानंतर प्रमोदने युपीआय (UPI) द्वारे ४६ हजार रुपये ट्रान्सफर केले.
काही वेळाने प्रमोदने ही घटना आपल्या एका नातेवाईकाला सांगितली. त्याने ही पूर्णपणे सायबर फसवणूक असल्याचं प्रमोदला नीट समजावून सांगितलं. त्यानंतर प्रमोदने कानपूर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.