शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

ट्रंकभर पुराव्यांसह कन्हैय्या आणि १० जणांविरोधात १२०० पानांचे आरोपपत्र; उद्यापासून सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 6:22 PM

कन्हैयासह सय्यद उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे.

ठळक मुद्दे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने आज पतियाळा हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले.भा. दं. वि. कलम १२४अ, ३२३, ४६५, १४३, १४९, १४७, १२० ब या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ३० वर्षे तपास आणि चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले.

नवी दिल्ली - जेएनयू येथे केलेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने आज पतियाळा हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले. जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारसह १० जणांवर २०१६ साली दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या खटल्यांतर्गत आरोप करण्यात आले आहेत. तब्बल १२०० पानांच्या या आरोपपत्रावर उद्यापासून सुनावणी होणार आहे.'हम लेके रहेंगे आजादी..., संगबाजी वाली आजादी..., भारत तेरे टुकड़े होंगे..., कश्मीर की आजीदी तक जंग रहेगी..., भारक के मुल्क को एक झटका और दो..., भारत को एक रगड़ा और दो..., तुम कितने मकबूल मरोगे..., इंडियन आर्मी को दो रगड़ा..' आदी घोषणा आरोपपत्रात नमूद करण्यात आल्या आहेत. ३० वर्षे तपास आणि चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले. तसेच एक ट्रंक भरून पुरावे कोर्टात सादर केले आहेत. आरोपपत्रात कन्हैया आणि अन्य आरोपींनी केलेल्या कथित १२ घोषणांचाही समावेश करण्यात आला आहे. कन्हैयासह सय्यद उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ला करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यवर आहे. या प्रकरणातील आरोपींची साक्ष सीआरपीसीच्या त्या कलमांतर्गत नोंद करण्यात आली आहे. साक्ष पलटल्यास त्यांना शिक्षा होऊ शकते. या व्यतिरिक्त फॉरेन्सिक आणि फेसबुक डेटाच्या माध्यमातूनही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. भा. दं. वि. कलम १२४अ, ३२३, ४६५, १४३, १४९, १४७, १२० ब या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली