अल्पवयीन टोळक्याचा पुन्हा धुडगूस, एकावर कोयत्याने वार, रिक्षाच्या काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 08:43 IST2023-01-30T08:43:25+5:302023-01-30T08:43:59+5:30

ज्यांनी वार केला ते सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यामुळे येरवडा पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांना नोटीस देण्यात आली आहे.

Juvenile gang riots again, one stabbed, glass of rickshaw broken in Pune | अल्पवयीन टोळक्याचा पुन्हा धुडगूस, एकावर कोयत्याने वार, रिक्षाच्या काचा फोडल्या

अल्पवयीन टोळक्याचा पुन्हा धुडगूस, एकावर कोयत्याने वार, रिक्षाच्या काचा फोडल्या

- किरण शिंदे

पुणे : सहा महिन्यापूर्वी फुटबॉल खेळण्यावरून झालेल्या वादातून एका 19 वर्षीय तरुणावर पाच अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने वार केले. येरवड्यातील लक्ष्मी नगर येथील सार्वजनिक रस्त्यावर शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ज्यांनी वार केला ते सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. त्यामुळे येरवडा पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांना नोटीस देण्यात आली आहे. अब्दुल्ला अमीर उल्ला खान (वय 19, रा. लक्ष्मी नगर पोलीस चौकी समोर, येरवडा, पुणे) त्या तरुणाने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सहा महिन्यापूर्वी फुटबॉल खेळण्यावरून त्यांच्यात वाद झाले होते. त्याचाच राग मनात धरून फिर्यादी हे मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांची वाट अडवली. त्यांना ठार मारण्याचा उद्देशाने कोणता व लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींनी परिसरातील रिक्षांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Juvenile gang riots again, one stabbed, glass of rickshaw broken in Pune