माहिम खाडीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 14:12 IST2019-01-05T14:10:04+5:302019-01-05T14:12:46+5:30

प्राथमिक तपासात पोलिसांनी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खाडीत टाकला  असल्याचा अंदाज वर्तविला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. 

Junk's body found near Mahim Bay; Filed a murder case | माहिम खाडीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येचा गुन्हा दाखल 

माहिम खाडीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येचा गुन्हा दाखल 

ठळक मुद्दे२५ ते ३० वयोगटातील तरुणाचा हा मृतदेह असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या मृतदेहाच्या डोक्याच्या पाठीमागील व पुढील बाजूस अवजड वस्तूने मारून त्याला जीवे ठार मारण्यात आले आहे.याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. 

मुंबई - माहिम खाडीजवळील पाईप लाईनच्या बाजूस असलेल्या कांदळ वनाच्या शेजारील झुडूपात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा हा मृतदेह असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खाडीत टाकला  असल्याचा अंदाज वर्तविला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. 

माहिमच्या खाडी जवळील पाईप लाईननजीक असलेल्या झुडूपात २५ ते ३० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या डोक्याच्या पाठीमागील व पुढील बाजूस अवजड वस्तूने मारून त्याला जीवे ठार मारण्यात आले आहे. तसेच अज्ञात आरोपीने मृत व्यक्तीची ओळख लपविण्यासाठी त्याच्या अंगावरील कपडे काढून पुरावा नष्ट करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा मग काढायचे काम सुरु केले आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. 

Web Title: Junk's body found near Mahim Bay; Filed a murder case