धक्कादायक! घरात घुसून मारहाण केली, ओढून बाहेर आणले, आग लावली, ४ जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 10:40 IST2023-07-19T10:32:41+5:302023-07-19T10:40:16+5:30

जोधपूर येथील ओसियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

jodhpur crime news four people of same family killed in mutual enmity | धक्कादायक! घरात घुसून मारहाण केली, ओढून बाहेर आणले, आग लावली, ४ जणांची निर्घृण हत्या

धक्कादायक! घरात घुसून मारहाण केली, ओढून बाहेर आणले, आग लावली, ४ जणांची निर्घृण हत्या

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह जाळण्यात आले. हे प्रकरण ओसियनच्या रामनगर भागातील आहे, येथे रात्री उशिरा परस्पर वैमनस्यातून एकाच कुटुंबातील दोन महिला, एक पुरुष आणि सहा महिन्यांच्या चिमुरडीची अगोदर हत्या केली आणि नंतर मृतदेह घराच्या अंगणात ओढून नेण्यात आला आणि सर्व मृतदेहांना आग लावली. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. 

ही घटना रात्री उशिरा ३ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी घरातून धूर निघताना शेजारच्या लोकांनी पाहिले असता घराच्या अंगणात घरातील सर्व सदस्यांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतांमध्ये पूनराम, त्यांची पत्नी भंवरी, सून धापू यांचे मृतदेह ३० टक्के भाजले आहेत. आणि धापू यांच्या सहा महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

बनावट कंपन्यांतून दुबईत फिरवले ५३ कोटी; ईडीकडून दोन फ्लॅट जप्त

मिळालेली माहिती अशी, घटनेची माहिती मिळताच जोधपूर ग्रामीणचे एसपी धर्मेंद्र सिंह यादव आणि जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता घटनास्थळी पोहोचले. वैयक्तिक वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: jodhpur crime news four people of same family killed in mutual enmity