मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:52 IST2025-06-19T19:52:19+5:302025-06-19T19:52:44+5:30

जीजूने आधी मेहुणीसोबत संबंध ठेवले. मेहुणी गर्भवती झाल्यावर त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला आणि एक भयानक कृत्य केले.

jija crossed all limits with his sali got her abortion done when she got pregnant girl died hospital | मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!

मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका जीजूने आपल्या मेहुणीसोबत सर्व मर्यादा ओलांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जीजूने आधी तिच्यासोबत संबंध ठेवले. मेहुणी गर्भवती झाल्यावर त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला आणि एक भयानक कृत्य केले. त्याच्या या कृत्यानंतर मेहुणीची तब्येत बिघडू लागली. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यावर तिला वडिलांसोबत तिच्या घरी पाठवण्यात आले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान या युवतीचा मृत्यू झाला. गर्भपातानंतर झालेल्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाला. मझगई पोलिसांना शवविच्छेदन अहवाल आणि तक्रारीची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी आरोपी भावजीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मझगई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न फुलबेहड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणासोबत केले होते. त्याची मोठी मुलगी आजारी असल्यामुळे तिची २१ वर्षीय धाकटी बहीण (मृत युवती) आपल्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेली होती. या दरम्यान बहिणीच्या नवऱ्याने युवतीला फसवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. जेव्हा त्याला याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने तिचा गर्भपात करवून घेतला. गर्भपातानंतर युवती आजारी पडू लागली. जीजूने तिच्यावर उपचारही केले, परंतु तिची प्रकृती जास्तच बिघडल्याने ती आपल्या वडिलांच्या घरी परत आली. येथेच १७ जून रोजी तिचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टम अहवालात संसर्गामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी
गुरुवारी युवतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात युवतीच्या मृत्यूचे कारण संसर्ग (infection) असल्याचे नमूद केले आहे. डॉक्टरांनी व्हिसेरा देखील जतन केला आहे. पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी शवविच्छेदन अहवालाची पुष्टी केली. एसपींनी सांगितले की, गर्भपात झाल्यामुळे युवतीला संसर्ग झाला होता, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी जीजू अखिलेश याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. 

Web Title: jija crossed all limits with his sali got her abortion done when she got pregnant girl died hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.