'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर...' गाणं गात होते दोन मित्र, दोघांनी एकत्र केली आत्महत्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:47 AM2022-01-27T11:47:22+5:302022-01-27T11:48:48+5:30

Jharkhand Friend Suicide : मंगळवारी घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या टीमने घटनास्थळी जाऊन दोन्ही तरूणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. मृत तरूणांची नावे सुद्दु भुइयां आणि रामजन्म अशी आहेत.

Jharkhand : Two best friend hang themselves over love cheating in Palamu | 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर...' गाणं गात होते दोन मित्र, दोघांनी एकत्र केली आत्महत्या, कारण...

'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर...' गाणं गात होते दोन मित्र, दोघांनी एकत्र केली आत्महत्या, कारण...

googlenewsNext

(प्रातिनिधीक छायाचित्र)

झारखंडच्या (Jharkhand) पलामूमध्ये प्रेम, मैत्री आणि दगा अशा गोष्टींनी भरलेली एक घटना समोर आली आहे. जिथे 'शोले'तील जय-वीरूसारखी मैत्री ठेवणाऱ्या दोन मित्रांनी एकत्र आत्महत्या (Two friend Suicide) केली. त्यातील एकाला प्रेमात दगा मिळाला होता. ज्यामुळे तणावात येऊ तो जीव द्यायला जात होता. अखेरच्या वेळात त्याने मित्राला पूर्ण कहाणी सांगितली. मग काय त्याच्या दुसऱ्या मित्राने मित्रासोबत मरण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही तरूणांचा मृतदेह एका झाडावर लटकलेले आढळून आले.

मंगळवारी घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या टीमने घटनास्थळी जाऊन दोन्ही तरूणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. मृत तरूणांची नावे सुद्दु भुइयां आणि रामजन्म अशी आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, मरणाऱ्या दोन तरूणांपैकी एक दिव्यांग होता. ही संपूर्ण घटना प्रेमात मिळालेल्या दग्याच्या कारणावरून घडली. सुद्दु भुइंया नावाच्या तरूणाचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण होतं. दोघांमध्ये काही कारणाने वाद झाला होता. तरूणीने तरूणासोबत ब्रेकअप केलं. सुद्दु या घटनेमुळे तणावात होता. त्याने याची माहिती आपला दिव्यांग मित्र रामजन्म याला दिली.

सुद्दुने आपला मित्र रामजन्म याला सांगितलं की, आता त्याला जगायचं नाहीये. तो गळफास घेऊन आत्महत्या करायला जात आहे. मित्राचा हा निर्णय ऐकून रामजन्मने सुद्धा त्याच्यासोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी चार वाजता रामजन्म घरातून साडी घेऊन बाहेर पडला. दोघेही एका ठिकाणी पोहोचले आणि एका झाडाला गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली.

पोलीस अधिकारी रंजीत कुमार यांनी सांगितलं की, याआधीही सुद्दुने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी तो वाचला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

स्थानिक लोकांनी सांगितलं की, दोन्ही तरूणांची घट्ट मैत्री होती. रामजन्म ट्राय सायकलने चालत होता. सुद्दु नेहमी त्याच्या सायकलला धक्का देत होता. ते दोघेही नेहमी शोलेतील 'ये दोस्ती हम नहीं छोडेंग...तोडेंग दम मगर....' हे गाणं गात होते. दोघांनी गाातील लोकांसमोर अनेकदा सांगितलं होतं की, आम्ही सोबत जगू आणि सोबत मरू. अखेर ते खरं झालं. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
 

Web Title: Jharkhand : Two best friend hang themselves over love cheating in Palamu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.