उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:10 IST2025-11-08T15:09:22+5:302025-11-08T15:10:17+5:30
धाकट्या मुलाने त्याची पत्नी आणि वहिणीसह त्याच्या ८० वर्षीय आईला जमिनीवरून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धाकट्या मुलाने त्याची पत्नी आणि वहिणीसह त्याच्या ८० वर्षीय आईला जमिनीवरून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. वृद्ध महिलेने कसा तरी आपला जीव वाचवला. आपल्या मोठ्या मुलासह रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलिसांनी तक्रार ऐकल्यानंतर आरोपी सुना आणि लहान मुलाविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली.
झाशी जिल्ह्यातील सिप्री बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेलगुवा येथे ही घटना घडली. ८० वर्षीय मन्नू देवीचे पती मुलायम सिंह यादव यांचं आधीच निधन झालं आहे. वृद्ध महिलेला दोन मुलं आहेत, मंगल यादव आणि संतराम यादव दोघेही विवाहित आहेत. वृद्ध महिला मन्नू यांनी सिप्री बाजार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
२० वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर जमीन तिच्या नावावर करण्यात आली. आता तिचा धाकटा मुलगा संतराम, मोठी सून राममूर्ती आणि तिची धाकटी सून कुंती यांना ती जमीन बळकवायची आहे.
धाकटा मुलगा, त्याची पत्नी आणि वहिणीसह आईला बेदम मारहाण करतो, उपाशी ठेवतो आणि घरातील सर्व कामं देखील करायला लावतो. ते तिला रोजचं जेवणही देत नाहीत आणि सतत जीवे मारण्याची धमकी देतात. ५ नोव्हेंबर रोजी मोठा मुलगा पंचायतीला बोलावण्यासाठी गेला तेव्हा त्याला काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
एवढंच नाही तर दोन्ही सुना आणि धाकट्या मुलाने तिला जबरदस्तीने खत पाजून मारण्याचा प्रयत्न केला. सिप्री बाजार पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.