Jamil Sheikh murder case: Find the real mastermind, Pravin darekar contacted the Commissioner of Police by phone | जमील शेख हत्याप्रकरण : खरा सूत्रधार शोधावा, दरेकरांनी पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून साधला संपर्क

जमील शेख हत्याप्रकरण : खरा सूत्रधार शोधावा, दरेकरांनी पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून साधला संपर्क

ठळक मुद्देया प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या सुत्रधारांना गजाआड करावे. तसेच त्यातील कट उघड करावा, अशी विनंतीही  दरेकर यांनी केली आहे.

ठाणे :  मनसेचे राबोडीतील प्रभाग अध्यक्ष तथा कार्यकर्ते जमील शेख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे, अशी विनंती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

ठाण्यात दिवसाढवळया मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या


शांत शहर असा लौकिक असलेल्या असलेल्या ठाण्यात सोमवारी दिवसाढवळ्या घडलेल्या हत्याकांडाची विरोधी पक्षनेते दरेकर यांनी गंभीर दखल घेतली. ठाण्यातील कायदा व्यवस्थेबरोबरच शांतता कायम राहावी, यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त फणसळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या सुत्रधारांना गजाआड करावे. तसेच त्यातील कट उघड करावा, अशी विनंतीही  दरेकर यांनी केली आहे.

Web Title: Jamil Sheikh murder case: Find the real mastermind, Pravin darekar contacted the Commissioner of Police by phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.