शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

जळगाव हादरलं... भुसावळपाठोपाठ मुक्ताईनगर येथेही तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:06 PM

गेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय चैत्राम सावकारे (रा. चुंचाळे ता. यावल) याने शालक विशाल झोपेत असतांना डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याचा संशय आहे

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय चैत्राम सावकारे (रा. चुंचाळे ता. यावल) याने शालक विशाल झोपेत असतांना डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याचा संशय आहे

मुक्ताईनगर जि.जळगाव : भुसावळपाठोपाठ मुक्ताईनगर येथेही तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. सासरी मुक्कामी आलेल्या मेहुण्याने २१ वर्षीय विशालच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता शहरातील पशुवैद्यकीय चिकित्सालय शेजारील इमारतीत उघडकीस आली.

तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विशाल वामन ठोसरे या तरुणासाठी गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. गेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय चैत्राम सावकारे (रा. चुंचाळे ता. यावल) याने शालक विशाल झोपेत असतांना डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर संशयित मेहुणा फरार झाला आहे. गुरुवारी जावयासाठी पाहुणचार केल्यानंतर विशाल ठोसरे आणि मेहुणा विजय सावकारे वरच्या मजल्यावर झोपायला गेले. रात्री दोघे एकाच खोलीत झोपले. मात्र सकाळी  विशालचा मृतदेह आढळून आला तर मेहुणा येथून पसार झाल्याचे दिसून आले. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिसBhusawalभुसावळ