जळगावानजीक सालदाराचा खून; दोरीने बांधून मृतदेह विहिरीत फेकला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 02:02 PM2019-03-01T14:02:36+5:302019-03-01T14:08:03+5:30

रात्री दरोडेखोरांनी या काळे यांना मारहाण करीत बांधले आणि शेतातील विहिरीत फेकून दिले. 

Jalgaon murder; Dugged with a rope and buried the well in the well | जळगावानजीक सालदाराचा खून; दोरीने बांधून मृतदेह विहिरीत फेकला 

जळगावानजीक सालदाराचा खून; दोरीने बांधून मृतदेह विहिरीत फेकला 

Next
ठळक मुद्देकाळे हे सकाळी घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने मोबाईलवर संपर्क साधला. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

जळगाव - जळगावनजीक एका शेतातील सालदाराचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दौलत एकनाथ काळे (६१, रा. नेरी नाका, जळगाव) असे या सालदाराचे नाव आहे. दादरची कापणी सुरु असल्याने ते गुरुवारी रात्री शेतात  थांबले होते. रात्री दरोडेखोरांनी या काळे यांना मारहाण करीत बांधले आणि शेतातील विहिरीत फेकून दिले. 
काळे हे सकाळी घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने मोबाईलवर संपर्क साधला. ते प्रतिसाद देत नसल्याने तोच या शेतात आला. शेतात कुणीच नसल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्याला वडिलांचा मृतदेहच दिसला. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.  दुसरीकडे या शेताजवळ असलेल्या एका  मंदिरात दरोडेखोरांनी दरोडा  टाकून  मंदिरातील घंटा आणि दानपेटीतील रक्कम पळविली.

Web Title: Jalgaon murder; Dugged with a rope and buried the well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.