PNB अधिकाऱ्यासोबत महिलेने हॉटेलमध्ये बनवला Sex Video, बदनामीची धमकी देत मागितले 20 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 05:57 PM2021-10-10T17:57:31+5:302021-10-10T17:58:43+5:30

honeytrap case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बँक अधिकाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली.

jaipur woman made sex video with punjab national bank officer in hotel demanded rs 20 lakh defamation honeytrap case | PNB अधिकाऱ्यासोबत महिलेने हॉटेलमध्ये बनवला Sex Video, बदनामीची धमकी देत मागितले 20 लाख

PNB अधिकाऱ्यासोबत महिलेने हॉटेलमध्ये बनवला Sex Video, बदनामीची धमकी देत मागितले 20 लाख

googlenewsNext

जयपुर : आरपीएस हिरालाल सैनी यांचा (Hiralal Saini) महिला कॉन्स्टेबल आणि मुलासह आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल (Video Viral)झाल्याच्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. यातच आता राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) पुन्हा एका अश्लील व्हिडिओची चर्चा सुरू झाली आहे. (jaipur woman made sex video with punjab national bank officer in hotel, demanded rs 20 lakh defamation)

यावेळी जयपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या  (Punjab National Bank) अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये (Honeytrap Case)अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत बँक अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. नंतर या महिलेने ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बँक अधिकाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली. ब्लॅकमेलिंगमुळे व्यथित झालेल्या बँकेच्या अधिकाऱ्याने जयपूरच्या विधायकपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जयपूर पोलिसांनी सांगितले की, हनी ट्रॅप प्रकरणी विधायकपुरी पोलीस स्टेशनने एका महिलेला अटक केली आहे. 

या महिलेवर बँकेच्या अधिकाऱ्याला बलात्कार प्रकरणात फसवण्याची धमकी देऊन पैसे घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुन्हा नोंदवला होता की, सीमा शर्मा उर्फ ​​सपना शर्मा आणि इतर लोक त्यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची मागणी करत होते. 

या प्रकरणी पोलिसांनी कलम 384, 386, 506, 120 बी आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.  तक्रारदाराने पोलिसांना ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पेन ड्राईव्हही दिले होते. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी आणि तक्रारदाराच्या मोबाईल नंबरच्या कॉल डिटेल्सचे विश्लेषण केले आणि मोबाईल नंबरच्या आधारे आरोपी महिलेची ओळख पटवली.

या प्रकरणात पोलिसांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेताना राजापार्क येथील हनुमान ढाब्याजवळून महिलेला अटक केली. पोलिसांनी आरोपी महिलेच्या ताब्यातून 1,00,000 रुपये रोख जप्त केले आणि तिला अटक केली. पोलिसांनी सांगितले की सीमा शर्मा उर्फ ​​सपना शर्मा हिने तक्रारदाराला मोबाईलवर संपर्क साधला आणि बँकिंग क्षेत्रात मोठी रक्कम गुंतवण्यास करण्यास असल्याचे सांगत हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.

यावेळी तक्रारदारासोबत महिलेने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, या लैंगिक संबंधाचा व्हिडिओ बनवून बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची भीती दाखविली आणि 20 लाख रुपयांची मागणी केली.  दरम्यान,  याआधीही आरोपी महिलेला दिल्ली आणि अलवरमध्ये हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
 

Web Title: jaipur woman made sex video with punjab national bank officer in hotel demanded rs 20 lakh defamation honeytrap case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.