स्वत:च्याच जबाबावरून फसली जॅकलीन फर्नांडिस? फॅशन डिझायनरसोबत केला जाणार आमना-सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 13:16 IST2022-09-19T13:16:10+5:302022-09-19T13:16:49+5:30
Jacqueline Fernandes Sukesh Chandrashekhar : EOW च्या डिमांडवर जॅकलीन आज जॅकलीन तिचे बॅंक डिटेल्स देईल. सुकेशने जॅकलीनच्या आई-वडिलांना काय-काय गिफ्ट दिले. त्याशिवाय जॅकलीनने प्रायव्हेट जेटने कधी प्रवास केला होता त्याचेही ती डिटेल्स देईल.

स्वत:च्याच जबाबावरून फसली जॅकलीन फर्नांडिस? फॅशन डिझायनरसोबत केला जाणार आमना-सामना
Jacqueline Fernandes Sukesh Chandrashekhar : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सुकेश चंद्रशेखरसंबंधी 200 कोटी रूपयांच्या फसवणुकीच्या केसमध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला आज चौकशीसाठी बोलवलं. यादरम्यान EOW तिची फॅशन डिझायनर लीपाक्षीचा आमना-सामना करवणार आहे. याआधीच्या चौकशीत जॅकलीन टीमसमोर काही प्रश्वावरून असजह झाली होती. ज्यानंतर जॅकलीनकडून बॅंक खाते आणि सुकेशकडून मिळालेल्या गोष्टींचे डिटेल्स मागवले होते.
EOW च्या डिमांडवर जॅकलीन आज जॅकलीन तिचे बॅंक डिटेल्स देईल. सुकेशने जॅकलीनच्या आई-वडिलांना काय-काय गिफ्ट दिले. त्याशिवाय जॅकलीनने प्रायव्हेट जेटने कधी प्रवास केला होता त्याचेही ती डिटेल्स देईल. सूत्रांनुसार, सुकेशने जॅकलीनला प्रायव्हेट जेटसाठी पैसे दिले होते. सुकेश म्हणाला होता की, त्याच्या नातेवाईकाची डेथ झाली आहे, तू चेन्नईला ये. ज्यानंतर प्रायव्हेट सुकेशने अरेंज केलं होतं ज्याने जॅकलीन चेन्नईला गेली होती.
याआधी गेल्या बुधवारी EOW ने जॅकलीनची साधारण आठ तास चौकशी केली होती. यादरम्यान जॅकलीनचा सुकेशसोबत भेट करून देणाऱ्या पिंकी इराणीसोबत आमना-सामना झाला होता. याआधी पिंकी इराणी आणि जॅकलीनने वेगवेगळा जबाब दिला होता. पोलिसांनी सांगितलं की, चौकशी दरम्यान जॅकलीनने काही प्रश्नाची उत्तरं देणं टाळलं. यादरम्यान ती एक-दोन प्रश्नावेळी ती असहज झाली होती.
जॅकलीन आणि इराणीत वाद
सूत्रांनुसार, जेव्हा जॅकलीन आणि पिंकी इराणीचा आमना-सामना झाला तेव्हा जॅकलीन म्हणाली की, तिच्या एका ओळखीच्या एका व्यक्तीने 2013 मधील एका बातमीचं कटींग दाखवलं होतं. त्यात सुकेश चंद्रशेखरचे काळे कारनामे लिहिेले होते. त्यानंतर तिने लगेच सुकेशपासून अंतर ठेवलं आणि नातं तोडलं. नंतर पिंकी तिच्याकडे आली आणि तिने तिच्या मुलांची शपथ घेतली की, सुकेश चांगला माणूस आहे. जी बातमी तू पाहिली ती खोटी आहे. जॅकलीन म्हणाली की, सुकेशला समोर बोलवून हे स्पष्ट केलं जाऊ शकतं. यादरम्यान जॅकलीन आणि पिंकीमध्ये वादावादी झाली होती.
सुकेशची जवळची आहे पिंकी इराणी
पिंकी इराणी ही सुकेशची जवळची व्यक्ती आहे. जॅकलीनसहीत इतर अभिनेत्री आणि सुकेशमध्ये ती महत्वाचा धागा आहे. सुकेशकडून पिंकी इराणी जॅकलीनला कोट्यावधी रूपयांचे महागडे गिफ्ट पाठवत होती. चौकशी दरम्यान जॅकलीनने पिंकीवर आरोप केला की, तिला आधीपासून सुकेश ठग असल्याचं माहीत होतं. पण हे तिने लपवलं होतं.
सूत्रांनुसार, पोलिसांनी दोघींनाही समोरा-समोर बसवून महत्वाचे प्रश्न विचारले. जसे की, जॅकलीन सुकेशच्या संपर्कात कशी आली? पिंकी इराणीने जे गिफ्ट जॅकलीनला पाठवले त्यांचं पेमेंट कुणी केलं? पिंकी सुकेशच्या संपर्कात कशी आली? जॅकलीनला हे माहीत होतं का की, सुकेशने तिला जे गिफ्ट पाठवले ते ठगीच्या पैशातून आहेत का? त्याशिवाय इतर 50 प्रश्न विचारण्यात आले.