जे. डब्ल्यू. मॅरिएट पंचतारांकित हॉटेलशेजारी मसाज पार्लरमध्ये अवैध देहविक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 16:38 IST2018-12-04T16:37:16+5:302018-12-04T16:38:38+5:30

मिळालेल्या माहितीनुसार जुहू पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. दोन दिवसांपूर्वीच खार पोलिसांनी देखील मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्रीचा व्यापाराचा पर्दाफाश केला होता. 

J. W. Marriott Five Star Hotel Massage Parlor Nave Dehwick | जे. डब्ल्यू. मॅरिएट पंचतारांकित हॉटेलशेजारी मसाज पार्लरमध्ये अवैध देहविक्री 

जे. डब्ल्यू. मॅरिएट पंचतारांकित हॉटेलशेजारी मसाज पार्लरमध्ये अवैध देहविक्री 

ठळक मुद्दे पंचतारांकित हॉटेलशेजारी सुरु असलेल्या अवैध हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उध्वस्तहू पोलिसांना या मसाज पार्लरमध्ये स्पा ट्रीटमेंटच्या नावाखाली काही हायप्रोफाईल ग्राहकांना मुली पुरवून देहविक्रीचा गोरख धंदा भा. दं. वि. कलम २९४, ३४ आणि पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्यात आली

मुंबई - जुहू पोलिसांनी छापा टाकून जे. डब्ल्यू. मॅरिएट पंचतारांकित हॉटेलशेजारी सुरु असलेल्या अवैध हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. जे. डब्ल्यू. मॅरिएट पंचतारांकित हॉटेल सुरु असलेल्या मसाज पार्लरमध्ये अवैधरित्या देहविक्री केली जात असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जुहू पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. दोन दिवसांपूर्वीच खार पोलिसांनी देखील मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्रीचा व्यापाराचा पर्दाफाश केला होता. 

जुहू पोलिसांना या मसाज पार्लरमध्ये स्पा ट्रीटमेंटच्या नावाखाली काही हायप्रोफाईल ग्राहकांना मुली पुरवून देहविक्रीचा गोरख धंदा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री जे. डब्ल्यू. मॅरिएट पंचतारांकित हॉटेलशेजारी असलेल्या उबॉन मसाज पार्लरवर जुहू पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी देहविक्री करणारी एक महिला, एक ग्राहक आणि मॅनेजरला अटक केली आहे. भा. दं. वि. कलम २९४, ३४ आणि पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे खार पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्रीचा काळाधंद्याचा पर्दाफाश केला आहे. 

Web Title: J. W. Marriott Five Star Hotel Massage Parlor Nave Dehwick