आत्महत्या केलेल्या ' त्या ' मुलीचा शोध नाहीच, मृतदेह खाडीच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 21:19 IST2021-12-20T21:18:25+5:302021-12-20T21:19:41+5:30
Suicide Case :शुक्रवारी मयत मुलगा प्रशांत गोडे ( वय २२ रा. कल्याण कोळसेवाडी ) याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह रविवारी सायंकाळपर्यंत सापडला नाही.

आत्महत्या केलेल्या ' त्या ' मुलीचा शोध नाहीच, मृतदेह खाडीच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज
भिवंडी - भिवंडीतील कोनगाव येथील दुर्गाडी पुला वरुन मोटरसायकलने आलेल्या प्रेमी युगुलांनी कोनगाव खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी मयत मुलगा प्रशांत गोडे ( वय २२ रा. कल्याण कोळसेवाडी ) याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह रविवारी सायंकाळपर्यंत सापडला नाही. त्यामुळे मुलीचा मृतदेह खाडीच्या पाण्यात वाहून पुढे गेला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर शुक्रवारी मुलाचा मृतदेह सापडला मात्र मुलीचा मृतदेह अजूनही सापडला नसल्याने मयत प्रशांत सोबत त्याची मैत्रीण नक्की होती किंवा नाही या बाजूने देखील पोलीस तपाससुरू असल्याची माहिती कोनगाव पोलोसांनी दिली आहे. दरम्यान या आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बाईक वरून आलेल्या मुलीने आधी खाडीत उडी मारली त्यांनतर त्यांनतर मुलाने खाडी पात्रात उडी मारली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर रविवारी देखील मुलीच्या मृतदेहाचा तपास सुरू होता मात्र मुलाचा सायंकाळपर्यंत शोध लागलेला नव्हता.