चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 08:08 PM2019-01-28T20:08:59+5:302019-01-28T20:09:39+5:30

अरुंद रोडवर गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविले म्हणून व गाडीची चावी काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.

Iron rods beaten by seven accused due to playing horn in Chakan | चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल 

चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

चाकण : अरुंद रोडवर गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविले म्हणून व गाडीची चावी काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण करून दोन जणांना जखमी करून गाडीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी सात जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना शुक्रवारी ( दि. २५ ) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चाकण येथील समाधान बिअर बारच्या पुढे सर्व्हिस रस्त्यावर परदेशी यांच्या भंगाराच्या दुकानासमोर घडली. याबाबत कुणाल गणू लोहार (वय २१, रा. यशवंत कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण ) यांनी फिर्याद दिली आहे. या मारहाणीत दिनेश रमेश नाणेकर ( रा. नाणेकरवाडी, चाकण ) व त्यांचे साडू विशाल लक्ष्मण कामठे ( रा. कोहिंडे, ता.खेड ) हे जखमी झाले आहेत. 
याप्रकरणी श्रीकांत प्रवीण परदेशी, करण प्रवीण परदेशी व विक्रम परदेशी ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) यांच्यासह चार अनोळखी मित्र असा एकूण सात जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०१९ भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, १४१, १४३, १४७, १४८, १४९ व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
फिर्यादीचे मालक दिनेश नाणेकर व त्यांचे साडू विशाल कामठे यांनी अरुंद सर्व्हिस रस्त्यावरून जाताना गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविला असता व त्यांच्या सेलेरिओ गाडीची चावी काढली म्हणून जाब विचारला असता परदेशी व त्यांच्या अनोळखी चार मित्रांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गाडीचे नुकसान केले असल्याची माहिती ठाणे अंमलदार मोघे यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यादव हे पुढील तपास करीत आहेत. 


 

Web Title: Iron rods beaten by seven accused due to playing horn in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.