Instagram Friend Raped: सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरताना कुणावर टाकलेला विश्वास कसं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, याची प्रचिती देणारी एक घटना समोर आलीये. एका तरुणीला इन्स्टाग्रामवर भेटलेल्या तरुणासोबत मैत्री केल्या आयुष्यभराचा धडा मिळाला. तरुणाने तरुणीसोबत आधी मैत्री केली, नंतर प्रेम असल्याचे भासवलं आणि नंतर जे घडलं, त्याने तरुणीचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे. आभासी माध्यम असलेल्या इन्स्टाग्रावर तरुणीची एका तरुणासोबत ओळख झाली. त्याने तिला बोलण्यातूनच प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शिवपुरी जिल्ह्यातील सिल्लारपूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे.
मैत्री, प्रेमाचं नाटकं आणि बोलावलं घरी
तरुणीवर अनेकवेळा बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आकाश शर्मा असे आहे. तो इन्स्टाग्रामवरून तरुणीपर्यंत पोहोचला. त्याने आधी तिच्याशी मैत्री केली. नंतर प्रेम झाल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला.
वाचा >>कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
एक दिवस त्याने तरुणीला त्याच्या घरी बोलावलं. तरुणी घरी गेली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचा त्याने व्हिडीओही बनवला. आणि फोटोही काढले.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि पाच लाख
तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने त्याचे व्हिडीओ तरुणीला दाखवले. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तो देऊ लागला. हे व्हिडीओ दाखवून त्याने अनेकदा तिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. त्याचेही व्हिडीओ बनवले. इतकंच नाही, तर त्याने तरुणीच्या खात्यात असलेले साडेपाच लाख रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करून घेतले.
सततच्या अत्याचारांना कंटाळली अन्...
आरोपी बळजबरीने शरीरसंबंध ठेवायला भाग पाडत होता. त्यामुळे तरुणीला हे असह्य झाले आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली.
तरुणीने पोलिसांना सांगितले की, आधी त्याने शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ आणि फोटो काढले. नंतर ब्लॅकमेल करू लागला. त्याने माझ्याकडील साडेपाच लाख रुपयेही घेतले. तो धमकी देत होता की, व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करेल.
आरोपीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अनेक वेळा बलात्कार केला. ८ ऑगस्ट २०२४ रोजी त्याने तिच्या बँक खात्यातून ५५०००० रुपयेही काढून घेतले. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी तरुणीने त्याच्याविरोधात तक्रार दिली होती.
तरुण झाला होता फरार
हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर आकाश शर्मा हा फरार झाला होता. पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्यास ५००० हजार रुपये बक्षीस जाहीर केले. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.