मोबाईलचा चार्जर तोंडात घातल्याने शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:43 IST2019-05-21T19:41:09+5:302019-05-21T19:43:06+5:30
चार्जरचं बंद करण्याचे विसरल्याने हा प्रकार घडला.

मोबाईलचा चार्जर तोंडात घातल्याने शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू
बुलंदशहर - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. मोबाईल फोनचा चार्जर तोंडात घातल्याने वीजेच्या धक्का बसल्याने एका अडीज वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. सहवर असं या चिमुकल्याचं नाव आहे. घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल फोन चार्ज झाल्यानंतर तो काढला. मात्र, चार्जरचं बंद करण्याचे विसरल्याने हा प्रकार घडला.
इफ्तारीसाठी लहानग्या सहवरला घेऊन तिची आई रझिया जहांगिराबादला माहेरी आली होती. रझिया यांचे अंसारीयान कॉलनी येथे माहेर आहे. शनिवारी घरातील कुणीतरी आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जरला लावला होता. काही वेळाने त्या व्यक्तीने मोबाईल चार्जरमधून काढला. मात्र, चार्जर तसाच ठेवून ती व्यक्ती स्विच ऑफ करायचेही विसरून गेली. खेळता खेळता सहवरने चार्जरच्या वायरचे टोक तोंडात घातले आणि तिला वीजेचा धक्का बसला. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबातील कुणीही संपर्क केला नसल्याने आम्ही गुन्हा नोंदवला नसल्याचे जहांगिराबाद पोलीस ठाण्याचे एसएचओ अखिलेश प्रधान यांनी म्हटले आहे. या बाबत कुणी तक्रार घेऊन आल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असे प्रधान यांनी पुढे सांगितले.