अमानूष... मोटारसायकल स्पेअरपार्टसाठी नवऱ्यानेच विवाहितेला ठेवले उपाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 11:33 IST2022-02-08T11:33:11+5:302022-02-08T11:33:52+5:30

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलचे स्पेअर पार्ट घेण्याकरिता माहेरुन २ लाख रुपये आणि टीव्ही, फ्रीजसाठी ३ लाख रुपये घेऊन यावे म्हणून विवाहितेला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ केला

Inhuman ... starving a married woman for a motorcycle spare part by husband in solapur | अमानूष... मोटारसायकल स्पेअरपार्टसाठी नवऱ्यानेच विवाहितेला ठेवले उपाशी

अमानूष... मोटारसायकल स्पेअरपार्टसाठी नवऱ्यानेच विवाहितेला ठेवले उपाशी

सोलापूर/अक्कलकोट : मोटारसायकलचे स्पेअरपार्ट घेण्यासाठी माहेरून लाखो रुपये घेऊन येऊन यावेत म्हणून अक्कलकोट तालुक्यात मैंदर्गी येथे एका विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. याबाबत रेवती प्रवीण रामपुरे (रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत तिचा छळ करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलचे स्पेअर पार्ट घेण्याकरिता माहेरुन २ लाख रुपये आणि टीव्ही, फ्रीजसाठी ३ लाख रुपये घेऊन यावे म्हणून विवाहितेला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ केला. तू आवडत नाहीस... तू पसंत नाहीस असे म्हणत लग्न झाल्यापासून आजवर त्रास देत राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रवीण गुरुनाथ रामपुरे, महानंदा गुरुनाथ रामपुरे, गुरुनाथ तोटप्पा रामपुरे, गंगू संतोष परीट (सर्व रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) या चौघांविरुद्ध पोलिसांनी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नायक बाडीवाले करीत आहेत.

Web Title: Inhuman ... starving a married woman for a motorcycle spare part by husband in solapur