सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:08 IST2025-07-10T14:08:40+5:302025-07-10T14:08:59+5:30
दीपक साहू नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या घरमालकाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे.

सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक साहू नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या घरमालकाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. दीपकने दिलेल्या माहितीनुसार, लग्नापासूनच तो पत्नीवर यामुळे नाराज आहे. जेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीने त्याला सोनम-राजा हत्या प्रकरण आणि मेरठच्या मुस्कानची आठवण करून दिली. दीपकने पोलिसात तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
दीपक साहूचं २०१९ मध्ये आरतीशी लग्न झालं. त्यांना एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर आरतीचे घरमालक सचिन साहूसोबत प्रेमसंबंध आहेत. दीपकने याचा विरोध केला तेव्हा आरतीने त्याला धमकी दिली. आरतीने दीपकला धमकी दिली आणि म्हणाली, तू सोनम-राजा हत्या प्रकरण विसरलास का? एवढंच नाही तर तिने म्हटलं की मी मेरठची मुस्कान बनून तुझे ३६ तुकडे करेन आणि निळ्या ड्रममध्ये टाकेन.
राजा हत्या प्रकरणाचा उल्लेख करतात दीपक साहू खीप घाबरला आहे. त्याला भीती आहे की, त्याची पत्नी तिच्या बॉयफ्रेडसोबत मिळून त्याला मारून टाकू शकते. इंदूरची रहिवासी असलेल्या सोनमने लग्नानंतर मेघालयला हनिमूनला जाऊन तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केली.
दीपक आणि त्याच्या मुलाच्या जीवाला धोका आहे. त्याने इंदूर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे, परंतु आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. दीपकला रात्रीच्या वेळीही त्याच्या घरात सुरक्षित वाटत नाही. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तो गुपचूप घराबाहेर पडतो.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. दीपकने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीकडून त्याला आणि त्याच्या मुलाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. यामुळे घाबरला आहे आणि पोलिसांकडे मदतीची याचना करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.