'यांचा सोक्षमोक्ष लावतोच'; होमस्टेच्या वादातून महिलेची कारखाली चिरडून हत्या, १२ दिवसांपूर्वीच आली होती राहायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:49 IST2026-03-27T12:16:07+5:302026-03-27T12:49:59+5:30

मध्य प्रदेशात एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी बाप लेकाला अटक करण्यात आली आहे.

Indore Shocker Father Son Duo Arrested for Murdering Woman Resident Over Penthouse Dispute | 'यांचा सोक्षमोक्ष लावतोच'; होमस्टेच्या वादातून महिलेची कारखाली चिरडून हत्या, १२ दिवसांपूर्वीच आली होती राहायला

'यांचा सोक्षमोक्ष लावतोच'; होमस्टेच्या वादातून महिलेची कारखाली चिरडून हत्या, १२ दिवसांपूर्वीच आली होती राहायला

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात एका  इंजिनिअर  महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. इंदौरमध्ये एका निवासी संकुलातील पेंटहाऊसचा वापर एअरबीएनबी सारख्या व्यावसायिक कामासाठी करण्यावरून झालेल्या वादात ४२ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर शम्पा पांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपीने रागाच्या भरात त्यांच्या अंगावर कार घालून त्यांना भिंतीला घासून चिरडले.

ही घटना इंदौरच्या लासुडिया भागातील शिव वाटिका समृद्धी एन्क्लेव्हमध्ये घडली. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर कुलदीप चौधरी नावाच्या व्यक्तीचे ३-४ पेंटहाऊस आहेत. हे पेंटहाऊस तो पर्यटकांना भाड्याने देत असे. निवासी संकुलात अनोळखी लोकांचा वावर वाढल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून याला विरोध करत होते.

बुधवारी रात्री पुन्हा एकदा पेंटहाऊस भाड्याने दिल्याने रहिवाशांनी त्याचा वीज पुरवठा खंडित केला. यावर संतापलेल्या कुलदीप चौधरीने संपूर्ण इमारतीची वीज कापली, ज्यातून मोठा वाद निर्माण झाला.

'आज यांचा सोक्षमोक्ष लावतो' आणि क्रूरतेचा कळस

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कुलदीप चौधरीने आपल्या मुलाला फोन करून बोलावून घेतले आणि म्हणाला, "ये, आज यांचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचा आहे." मोनिश तिथे आपल्या स्विफ्ट कारने आला आणि त्याने संकुलाच्या आवारातच ६०-७० च्या वेगाने कार चालवून लोकांना उडवण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, मोनिशने आधी एका सुरक्षा रक्षकाच्या पत्नीला धडक दिली. त्यानंतर त्याने कार वळवली आणि थेट शम्पा पांडे यांना धडक देऊन त्यांना भिंतीवर चिरडले. इतक्यावरच न थांबता त्याने त्यांच्या अंगावरून गाडी नेली. गंभीर जखमी झालेल्या शम्पा यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दोन चिमुकल्यांचं छत्र हरपलं

मृत शम्पा पांडे या व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या आणि त्यांचे पती सौरभ पांडे देखील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहेत. हे कुटुंब अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच या सोसायटीत राहायला आले होते. शम्पा यांना दोन लहान मुले आहेत.

दरम्यान, घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुलदीप चौधरी आणि त्याचा मुलगा मोनिश या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे तपास सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे.

Web Title : होमस्टे विवाद में महिला की हत्या, कार से कुचलकर मौत

Web Summary : इंदौर में होमस्टे विवाद में एक सॉफ्टवेयर इंजीनियर की दुखद मौत हो गई। निवासियों द्वारा बिजली काटने से गुस्साए आरोपी ने महिला को कार से कुचल दिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर जांच शुरू कर दी है।

Web Title : Home-stay Dispute Turns Deadly: Woman Killed, Run Over by Car

Web Summary : In Indore, a home-stay dispute led to the tragic death of a software engineer. Angered by residents cutting power, the accused ran her over with a car, killing her. Police have arrested the accused and are investigating.