कॅनडात भारतीय यूट्यूबरची क्रूर हत्या! नॅन्सी ग्रेवालवर घरात घुसून हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:02 IST2026-03-05T13:02:01+5:302026-03-05T13:02:35+5:30

एका अज्ञात हल्लेखोराने नॅन्सीच्या घरात शिरून तिच्यावर चाकूने सपासप वार केले.

Indian YouTuber brutally murdered in Canada! Nancy Grewal attacked after breaking into her home | कॅनडात भारतीय यूट्यूबरची क्रूर हत्या! नॅन्सी ग्रेवालवर घरात घुसून हल्ला

कॅनडात भारतीय यूट्यूबरची क्रूर हत्या! नॅन्सी ग्रेवालवर घरात घुसून हल्ला

आपल्या परखड विचारांसाठी प्रसिद्ध असलेली पंजाबी यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नॅन्सी ग्रेवाल (४५) हिची विंडसर येथील राहत्या घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एका अज्ञात हल्लेखोराने नॅन्सीच्या घरात शिरून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नॅन्सीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नॅन्सीच्या बेधडक विधानांमुळेच कट्टरपंथ्यांनी तिचा काटा काढल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमकी घटना काय?

लासाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोराने घरात घुसून नॅन्सीवर जीवघेणा हल्ला केला आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी नॅन्सीला रुग्णालयात दाखल केले, परंतु जखमा खोल असल्याने तिची प्राणज्योत मालवली. बुधवारी सायंकाळी पोलीस अधिकारी मायकल पियर्स यांनी या दुर्दैवी घटनेची पुष्टी केली.

कोण होती नॅन्सी ग्रेवाल?

नॅन्सी ग्रेवाल ही केवळ एक यूट्यूबर नव्हती, तर पंजाबच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर तुटून पडणारी एक सक्रिय कार्यकर्ती होती. नॅन्सी आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून कॅनडात वाढणाऱ्या खालिस्तानी कट्टरवादावर जोरदार टीका करायची. भारत-कॅनडा या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावावर ती भारताची बाजू भक्कमपणे मांडत असे. तिने तुरुंगात असलेले खासदार अमृतपाल सिंह, अकाली दलाचे बिक्रम सिंह मजीठिया आणि डेरा ब्यास प्रमुख गुरिंदर सिंह ढिल्लो यांच्या विरोधातही अनेकदा आवाज उठवला होता.

शेवटच्या पोस्टमध्ये अकाल तख्तच्या जत्थेदारांना इशारा

नॅन्सीने तिच्या हत्येच्या ६ दिवस आधी इन्स्टाग्रामवर एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने श्री अकाल तख्त साहिबच्या जत्थेदारांवर सडकून टीका केली होती. "जेव्हा सामान्य जनता आणि खरे शीख एकत्र येतील, तेव्हा ते तुम्हाला सोडणार नाहीत," अशी थेट ताकीद तिने जत्थेदारांना दिली होती. या व्हिडिओमुळे कट्टरवादी गटांमध्ये तिच्याबद्दल प्रचंड रोष होता, अशी माहिती समोर येत आहे.

जून २०२५ मध्ये बठिंडाची इन्फ्लुएन्सर कंचन कुमारी हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर नॅन्सीने तिच्या न्यायासाठी मोठी मोहीम राबवली होती. मात्र, आता दुसऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या या रणरागिणीचा स्वतःचाच अशा प्रकारे अंत झाल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. कॅनडातील लासाल पोलीस आता या प्रकरणाचा हेट क्राइम किंवा राजकीय हत्येच्या कोनातून तपास करत आहेत.

Web Title : कनाडा में भारतीय यूट्यूबर नैन्सी ग्रेवाल की निर्मम हत्या!

Web Summary : पंजाबी यूट्यूबर नैन्सी ग्रेवाल की कनाडा स्थित घर में हत्या कर दी गई। एक हमलावर ने उसे चाकू मार दिया, जिससे अस्पताल में उसकी मौत हो गई। ग्रेवाल खालिस्तानी उग्रवाद की आलोचना और संवेदनशील विषयों पर बोलने के लिए जानी जाती थी, जिसके कारण संभवतः उस पर हमला हुआ। पुलिस मामले की जांच घृणा अपराध या राजनीतिक हत्या के रूप में कर रही है।

Web Title : Indian YouTuber Nancy Grewal Brutally Murdered in Canada Home

Web Summary : Punjabi YouTuber Nancy Grewal was murdered in her Canadian home. An attacker stabbed her, leading to her death in hospital. Grewal was known for criticizing Khalistani extremism and speaking on sensitive topics, possibly leading to the attack. Police are investigating the case as a hate crime or political assassination.