Indecent treatment of a young woman as she depose in court | कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लिल वर्तन

कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लिल वर्तन

ठळक मुद्देयाप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.   

जळगाव : शैक्षणिक संस्था हस्तांतरणाच्या वादात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरुन सिग्नेट स्कूलचे संचालक मनिष रमेश कथुरिया (रा.मेहरुण तलाव परिसर) यांनी मेहरुण तलाव परिसरात फिरायला आलेल्या एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणीला अडवून तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
  

पीडितने दिलेल्या फिर्यादीवरुन, एमबीएचे शिक्षण घेत असलेली तरुणी शनिवारी डी मार्ट परिसरात मैत्रीणीला भेटण्यासाठी आली होती. तिला भेटून मेहरुण तलाव परिसरात फिरायला गेली असता ५.४५ वाजता मनिष कथरिया हा तेथे आला व ‘तू कोर्टात आमच्याविरुध्द साक्ष दिलेली आहे, ती मागे घे’ असे म्हणाला, त्यास साक्ष मागे घेणार नाही असे सांगितले असता कथुरिया याने अश्लित शिवीगाळ करुन अंगलट करुन अश्लिल वर्तन केले. या प्रकारामुळे आरडाओरड केल्याने बांधकामाच्या ठिकाणी असलेले मजूर तेथे आल्याचे पाहून कथुरिया तेथून निघून गेला. या प्रकारानंतर तरुणीने रात्री ११,३० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दरम्यान, ही तरुणी कथुरिया यांच्या शाळेत पूर्वी शिक्षिका होती. दोन दिवस आधीच या संस्थेच्या वादातून मनिष कथुरिया याच्या फिर्यादीवरुन विकास परिहार व संजय परिहार (रा.भगीरथ कॉलनी) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. सहायक फौजदार अतुल वंजारी या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.

Web Title: Indecent treatment of a young woman as she depose in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.