‘प्राप्तिकर’ने शोधला ५०० कोटींचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 04:34 IST2020-10-28T04:34:25+5:302020-10-28T04:34:55+5:30
Income tax News : प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

‘प्राप्तिकर’ने शोधला ५०० कोटींचा घोटाळा
नवी दिल्ली : दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा अशा विविध राज्यांमध्ये होत असलेला घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. यामध्ये ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्राथिमक अंदाज असून, तपास सुरु आहे.
प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या रॅकेटकडून वेगवेगळ्या गटांद्वारे खोटे व्यवहार दाखवून सरकारची फसवणूक केली जात असल्याचे या धाडींमधून उघड झाले आहेत. या रॅकेटकडून वेगवेगळ्या खोट्या फर्म स्थापन करून त्यांच्याद्वारे खोटी बिले तयार करुन तसेच असंरक्षित कर्ज दाखवून पैसा हा काही व्यक्तींच्या नावावर वर्ग होत होता. या व्यक्तीची विविध बॅंकांध्ये खाती व लाॅकर असल्याचे उघडकीस आले आहे.