उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:36 IST2021-10-07T17:14:43+5:302021-10-07T17:36:40+5:30
Income tax department raids :

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे
कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीच्या कार्यालयावरआयकर विभागाने गुरुवारी छापा टाकला. पवार यांच्या बहिण विजया पाटील यांची पब्लिशिंग कंपनी आहे. त्या राजकारणाशी संबंधित नाहीत. त्यांची कोणतीही कंपनी नाही.पब्लिशिंग कंपनी असली तरी त्याचीही उलाढाल मर्यादित आहे. विजया पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोठ्या बहिण आहेत.
पवार यांच्या अनेक निवडणुकीत त्या यंत्रणा राबवण्यात पुढे असतात. एका माध्यम समूहातून सरव्यवस्थापक पदावरून बाजूला झाल्यावर त्या या पब्लिशिंग कंपनीचे काम पाहतात. गुरुवारी सकाळी आयकरच्या सहा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली. परंतु त्याबद्धल अधिकृत दुजोरा मिळाला नाही. विजया पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री पवार यांनीच घेतल्याचे तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्याची चौकशी करताना आयकर विभागाने त्यांच्या कोल्हापुरातील व पुण्यातील बहिणीच्या घरी छापे टाकले.