माझ्यासोबत संबंध ठेव, अन्यथा तुझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करेन; सासऱ्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 17:12 IST2021-12-28T17:00:29+5:302021-12-28T17:12:18+5:30
सोलापूरमधील पंढरपूरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

माझ्यासोबत संबंध ठेव, अन्यथा तुझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करेन; सासऱ्याची धमकी
सोलापूर: सोलापूरमधील पंढरपूरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सासऱ्याने सुनेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी दुपारी साडेबाराच्या सुमारास पीडित महिला घरी एकटी होती. हे पाहून तिच्या सासऱ्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पीडिता ही जोरात ओरडल्यानंतर तिला त्यांनी सोडून दिले होते. याबाबतची माहिती पीडित महिलीने पतीला दिली; परंतु त्यावेळी त्याने पीडितेची समजूत घातली होती, असं पीडितेने सांगितलं.
मागील सोमवारी (२० डिसेंबर) रोजी सकाळी आठच्या सुमारास पीडित महिला बाथरुममध्ये आंघोळ करीत होती. यावेळी तिच्या सासऱ्याने तिला न कळत ती आंघोळ करताना मोबाइलमध्ये शुटींग काढले. त्याने हा व्हिडिओ पीडितेस दाखवला. तुला माझ्या मुलापासून मूलबाळ होणार नाही, तू माझ्याशी संबंध ठेव तुला मूलबाळ होईल. तू संबंध नाही ठेवले तर मी तुझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करेन, असे म्हणून ब्लॅकमेल केले.
संबंधित पीडिता हिने फोन करण्याच्या कारणाने तिच्या सासऱ्याचा मोबाइल घेतला व सासऱ्याची नजर चुकवून तो पीडिता हिने पाहून खात्री करून तो पीडितेच्या भावाच्या मोबाइलवर पाठवला. त्यानंतरही त्या पीडित महिलेच्या सासऱ्याने तो व्हिडिओ तिला वारंवार दाखवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होता. याबाबत पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर तत्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.