शहाद्यात लग्नात नाचण्याच्या वादातून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 21:26 IST2023-04-10T21:25:37+5:302023-04-10T21:26:16+5:30

याप्रकरणी चाैघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

In Shahada, beaten due to a dispute over dancing at a wedding | शहाद्यात लग्नात नाचण्याच्या वादातून मारहाण

शहाद्यात लग्नात नाचण्याच्या वादातून मारहाण

नंदुरबार : शहादा शहरातील शिवाजी चाैकात लग्नात नाचण्याच्या कारणातून महिलेसह तिघांना मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाैघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहाद्यातील शिवाजी चाैकात रविवारी लग्नात नाचण्याच्या वादातून चंद्रसिंग जयसिंग वसावे याला मारहाण झाली होती. याचा जाब विचारण्यासाठी रेशमाबाई भुरा पवार रा. भेंडवा नाला याला विचारणा करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी विचारणा केल्याचा राग येऊन साजन ऊर्फ ऐकूसिंग लालसिंग ठाकरे (४०) याने रेशमाबाई यांना मारण्याची धमकी दिली. यावेळी रेशमाबाई यांच्यासोबत असलेले दीपक नामदेव कुंभारे आणि पिंट्या उद्धव वसावे यांनी ऐकूसिंग याला जाब विचारला असता, दोघांना ऐकूसिंग याच्यासह चाैघांकडून मारहाण करण्यात आली. 

या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेशमाबाई पवार यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित साजन ऊर्फ ऐकूसिंग ठाकरे (४०) याच्यासह तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार संजय ठाकूर करत आहेत.
 

Web Title: In Shahada, beaten due to a dispute over dancing at a wedding