प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:39 IST2025-08-07T12:37:19+5:302025-08-07T12:39:28+5:30

या हल्ल्यावेळी रंगाने भरतला मागून पकडले होते. यावेळी तिथेच उपस्थित असणाऱ्या राजश्रीने ना हस्तक्षेप केला, ना भरतला वाचवण्याचा प्रयत्न केला

In Mumbai, Husband murdered with the help of lover! Daughter exposes mother's conspiracy, Police Arrested wife | प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले

प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले

मुंबई - गोरेगावच्या आरे कॉलनीत राहणाऱ्या ३५ वर्षीय राजश्री अहिरे हिने प्रियकरासोबत मिळून पती भरत अहिरे याची हत्या केली आहे. भरत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचा. भरतच्या हत्येचा कट रचणाऱ्या पत्नी राजश्रीला पोलिसांनी अटक केली आहे परंतु प्रियकर चंद्रशेखर आणि इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांना शोध घेत आहेत. 

माहितीनुसार, भरतची हत्या राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यातील प्रेमसंबंधामुळे झाली. मागील महिन्यात भरत आणि राजश्रीत वाद झाला होता. त्यावेळी चंद्रशेखरबाबत भरतने पत्नीला विचारणा केली. त्यानंतर पत्नीने भरतवर मानसिक छळाचा आरोप केला. त्यानंतर भरतने चंद्रशेखरला फोन केला आणि त्याला आरे कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ भेटायला बोलावले. त्याचवेळी राजश्रीही त्याठिकाणी पोहचली होती. १५ जुलैला रात्री चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार रंगा हे भरतला भेटले तेव्हा त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी चंद्रशेखरने भरतच्या छातीवर, पोटावर आणि शरीरावरील अन्य भागावर लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. 

या हल्ल्यावेळी रंगाने भरतला मागून पकडले होते. यावेळी तिथेच उपस्थित असणाऱ्या राजश्रीने ना हस्तक्षेप केला, ना भरतला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नागरीक घटनास्थळी जमू लागले तेव्हा हल्लेखोर तिथून पळून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेत पतीला हॉस्पिटलला नेण्याऐवजी राजश्रीने भरतला घरी नेले आणि ३ दिवस विना उपचार घरीच ठेवले. या जोडप्याला ३ मुले आहेत, त्यात १३ वर्षीय मुलगी, ५ वर्षीय दुसरी मुलगी आणि ३ वर्षाचा मुलगा आहे. या तिघांनी वडिलांची अवस्था पाहिली. जेव्हा वडिलांना रक्ताच्या उलट्या झाल्या तेव्हा घरातील मोठ्या मुलीने नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर भरतची वहिनी घरी आली तेव्हा राजश्रीने भरत दुचाकी अपघातात जखमी झाल्याचं खोटे सांगितले. 

त्यानंतर भरतला मालाड इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्येही राजश्रीने अपघाताची खोटी कहाणी सांगितली. भरतनेही दबावापोटी पत्नीच्या बोलण्याला दुजोरा दिला. परंतु पोलिसांना जबाबात काही तरी गडबड वाटली. भरतने दिलेल्या जबाबानंतर त्याच्या मुलीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी भरतला मारहाण झाल्याचे आणि तिथेच आई गपचुप उभी राहून पाहत असल्याचे पोलिसांना सांगितले. राजश्रीने पतीला हॉस्पिटलला न नेता उपचाराविना त्याला घरीच ठेवले. अखेर ५ ऑगस्टला उपचारावेळी भरतचा मृत्यू झाला. मुलीने दिलेल्या जबाबामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे तर २ फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 

Web Title: In Mumbai, Husband murdered with the help of lover! Daughter exposes mother's conspiracy, Police Arrested wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.