Mumbai Accident: १०० च्या स्पीडने अल्पवयीन कार चालकाने दिली जोरात धडक; दाम्पत्य ५० फूट दूर फेकले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:05 IST2026-02-09T11:04:34+5:302026-02-09T11:05:24+5:30

Mumbai Ghatkopar Accident: अपघातानंतर १७ वर्षीय अल्पवयीन कारचालक आणि त्याचे वडील भूषण यांना स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

In Ghatkopar, a minor driving a car collided forcefully with a motorcycle, injuring a couple | Mumbai Accident: १०० च्या स्पीडने अल्पवयीन कार चालकाने दिली जोरात धडक; दाम्पत्य ५० फूट दूर फेकले गेले

Mumbai Accident: १०० च्या स्पीडने अल्पवयीन कार चालकाने दिली जोरात धडक; दाम्पत्य ५० फूट दूर फेकले गेले

Mumbai Ghatkopar Accident: घाटकोपरवरून लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने दिशेने जाणाऱ्या अल्पवयीन कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ५ फेब्रुवारीच्या रात्री सव्वाअकरा  वाजता तानसा पाइपलाइन रोड, विद्याविहार परिसरात  सोमय्या कॉलेजच्या गेटसमोर हा अपघात घडला. या प्रकरणी अल्पवयीन कारचालक मुलाचे वडील वालजी राजा भूषण (वय ४३) यांच्याविरोधात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घाटकोपरच्या त्रिमूर्ती इमारतीत राहणारे धुरमील प्रेमजी पटेल (३३) यांचे लोअर परळमध्ये प्लायवूड रिटेलचे दुकान आहे. घटनेच्या रात्री ते दुकान बंद करून पत्नी मीनल यांच्यासोबत दुचाकीने घरी परतत असताना समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे या कारचा वेग ताशी सुमारे १०० किलोमीटर होता. कारच्या धडकेनंतर पटेल दाम्पत्य सुमारे ५० फूट दूर फेकले गेले.

जखमींवर उपचार सुरू
अपघातानंतर १७ वर्षीय अल्पवयीन कारचालक आणि त्याचे वडील भूषण यांना स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या धुरमील आणि मीनल यांना तातडीने उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी  घाटकोपरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.  दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पोलिसांनी धुरमील याचे काका महेश पटेल (५७) यांची फिर्याद नोंदवून या प्रकरणी भूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : तेज़ रफ़्तार नाबालिग़ चालक ने दंपत्ति को मारी टक्कर; 50 फीट दूर फेंके गए

Web Summary : मुंबई के विद्याविहार में 100 किमी प्रति घंटे की रफ़्तार से गाड़ी चला रहे एक नाबालिग़ ने एक दंपत्ति को टक्कर मार दी। दंपत्ति गंभीर रूप से घायल हो गए और 50 फीट दूर जा गिरे। नाबालिग के पिता पर मामला दर्ज।

Web Title : Minor Driver Hits Couple at 100 kmph; Thrown 50 Feet

Web Summary : A minor driving at 100 kmph hit a couple in Vidyavihar, Mumbai. The couple was critically injured and thrown 50 feet. The minor's father has been charged by police.