शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेड काढल्यावरुन युवकाचा खून, निलगिरी बाग परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 09:38 IST

याप्रकरणी आडगाव पोलिसांनी निलगिरी बाग येथे राहणाऱ्या अमोल साळवे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

संदीप झिरवाळ

नाशिक : वारंवार बहिणीची छेड काढत असल्याच्या  कारणावरून औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेत राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडे दहा वाजता घडली आहे. निलगिरी बाग येथे असलेल्या मोकळ्या पटांगणात घडलेल्या या घटनेत परिसरातच  राहणाऱ्या विकास रमेश नलावडे (२७) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी निलगिरी बाग येथे राहणाऱ्या अमोल साळवे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलगिरी बाग येथिल घरकुल योजनेत राहणारा मयत विकास नलावडे हा गेल्या काही दिवसांपासून संशयित आरोपी असलेल्या साळवे याच्या बहिणीची छेड काढत होता. त्यातून नलावडे व साळवे या दोघात यापूर्वीही वाद  झाले होते.मात्र बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास  मयत नलावडे याने संशयित साळवे याला निलगिरी बाग बिल्डिंग नंबर ५ जवळ मोकळ्या पटांगणात बोलावून घेतले आणि तुझ्या बहिणीची लग्न करायचे आहे असे सांगितले. त्यातून दोघात वाद झाले. त्यानंतर बहिणीची छेड काढत असल्याने पुर्वीपासून मनात राग असलेल्या साळवे याने धारदार चॉपरने नलावडे याच्यावर वार केले. या घटनेत नलावडे गंभीर जखमी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.  त्याला तत्काळ उपचारासाठी  आडगाव येथील डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु ,उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी साळवे याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेतील मयत नलावडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे आडगाव पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस