२१ वर्षीय युवक होता अनेक दिवस बेपत्ता; 'इन्स्टाग्राम'वरील मैत्रिण निघाली ४० वर्षीय विधवा, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:07 IST2026-01-06T17:06:55+5:302026-01-06T17:07:19+5:30
घरातील वादाचा आवाज ऐकून आसपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांनी त्या विधवा महिलेला समजावले

२१ वर्षीय युवक होता अनेक दिवस बेपत्ता; 'इन्स्टाग्राम'वरील मैत्रिण निघाली ४० वर्षीय विधवा, मग...
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री एका कुटुंबासाठी डोकेदुखी ठरली आहे. अमरोहा येथे राहणारा २१ वर्षीय युवक गेल्या अनेक दिवसांपासून घरातून गायब होता. मुलाच्या शोधासाठी त्याची आई अमरोहा ते आग्रा येथे पोहचली आणि जसं इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या घरी पोहचली तेव्हा तिथे मोठा गोंधळ घातला.
माहितीनुसार, अमरोहाचा युवक काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. नातेवाईकांनी जेव्हा त्याचा शोध सुरू केला तेव्हा त्याची मैत्री आग्राच्या यमुना परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत झाल्याचं कळले. या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. या युवकाचे वय २१ वर्ष होते तर महिलेचे वय ४० वर्ष होते. ही महिला विधवा असून ती एकटीच राहत होती.
मुलाबाबत घरच्यांना कळले तेव्हा त्यांनी आग्रा गाठले. त्याठिकाणी पोहचताच हा मुलगा मागील काही दिवसांपासून त्याच महिलेच्या घरी राहत होता हे समोर आले. मुलगा अचानक गायब झाल्याने आईला चिंता लागली होती. तिने पोलिसांकडे मदत मागितली. स्थानिक स्तरावर संपर्क वाढवला. बेपत्ता युवकाची आई भाजपाशी निगडित आहेत त्यामुळे तिने स्थानिक भाजपा नेत्यांची मदत घेतली. नेत्यांच्या मदतीने तिला महिलेच्या घरचा पत्ता सापडला. जसं मुलाची आई त्या महिलेच्या घरी पोहचली तेव्हा आईला पाहून मुलगा पळण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी मोठा गोंधळ झाला.
घरातील वादाचा आवाज ऐकून आसपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांनी त्या विधवा महिलेला समजावले. तुझं आणि त्या मुलाचे वय यात खूपच अंतर आहे. स्थानिक नेत्यानेही या प्रकरणात हस्तक्षेप करत महिलेशी संवाद साधला. त्यानंतर महिलेला तिची चूक कळली आणि हे प्रकरण तिथेच शांत करण्यात आले. या प्रकाराबाबत पोलिसांना कळले तेव्हा पोलीस तिथे पोहचली. मुलगा आणि महिला दोघेही वयस्क असल्याने पोलिसांनी फक्त तिथे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेतली. दोन्ही बाजूकडून एकमेकांशी संवाद साधत हे प्रकरण शांत करण्यात आले आणि मुलगा त्याच्या आईसोबत पुन्हा घरी गेला.