Imitate PubG game, killed a minor boy, hides dead body by uncle pda | पबजी गेमच्या अनुकरण करणं अल्पवयीन मुलाला भोवलं, मामाने मृतदेह ठेवला लपवून

पबजी गेमच्या अनुकरण करणं अल्पवयीन मुलाला भोवलं, मामाने मृतदेह ठेवला लपवून

ठळक मुद्दे 2 एप्रिल रोजी अछनेरा भागातील कठवारी या खेड्यातील रहिवासी शमशेरची चार वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती.पोलिसांनी चप्पल जप्त केली असता त्यांचा सोहनवरील संशय अधिकच बळावला.

आग्रा - उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात एका 12 वर्षाच्या मुलाने पबजी खेळाची नक्कल करत शेजारच्या घरात राहणाऱ्या चार वर्षाच्या मुलीची मान मोडली  आणि तिचा त्यामुळे मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर आरोपीने आपल्या मामाच्या मदतीने मृतदेहाच्या गळ्यात फाशीचा दोरखंड घातला आणि मृतदेह भुश्यात लपवून ठेवला. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस बाल सुधार गृहात पाठवले आहे. तर मामला तुरुंगात पाठवले आहे.

2 एप्रिल रोजी अछनेरा भागातील कठवारी या खेड्यातील रहिवासी शमशेरची चार वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी त्याची चौकशी केली, पण काहीही सापडले नाही. दुसर्‍याच दिवशी तिचा मृतदेह भूश्याच्या पेंढ्यात सापडला. कुटूंबियांनी कोणाबरोबर वाद नसल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी शवविच्छेदन केले असता अहवालात गुदमरल्यामुळे मृत्यूची नोंद झाली. शरीरावर इतर कोठेही जखमा नव्हत्या.


एसपी ग्रामीण रवी कुमार यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह तिच्या वडिलांच्या घराच्या नजीकच्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी शमशेरच्या घरात राहणाऱ्या सोहनची चौकशी केली आणि त्याने आपल्याला यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगितले. पण एक चप्पल कुंपणात  पडलेली पाहिली होती. पोलिसांनी चप्पल जप्त केली असता त्यांचा सोहनवरील संशय अधिकच बळावला. सखोल चौकशी केल्यावर सोहनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा अल्पवयीन भाचा आला असल्याची माहिती दिली. 

भाच्याला पबजी गेमचे व्यसन होते. 2 एप्रिल रोजी संध्याकाळी त्याने एका मुलीला पकडले आणि तिच्या मानेला धरून उचलले. तिचा गळा पकडताच मुलाचा मृत्यू झाला. भाचा घाबरला आणि त्याने मृतदेह टाकून पळ काढला. त्याने मामा सोहन यांना सांगितल्यावर सोहनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलाच्या गळ्याला दोरी बांधून मृतदेह एका पेंढामध्ये लपविला. 

 

Web Title: Imitate PubG game, killed a minor boy, hides dead body by uncle pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.