जालन्यात अवैध गर्भपात; पतीसह चार जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 15:08 IST2023-02-08T15:06:33+5:302023-02-08T15:08:10+5:30

गतवर्षी जिल्हा आरोग्य विभाग व चंदनझिरा पोलिसांनी जालना शहरातील ढवळेश्वर येथील डॉ. सतीश गवारे यांच्या क्लिनिकवर छापा टाकला होता.

Illegal Abortion in Jalna; Crime against four persons including husband | जालन्यात अवैध गर्भपात; पतीसह चार जणांवर गुन्हा

जालन्यात अवैध गर्भपात; पतीसह चार जणांवर गुन्हा

बदनापूर (जि. जालना) : गतवर्षी आरोग्य विभागाने उघडकीस आणलेल्या अवैध गर्भपात प्रकरणानंतर आता पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील एका विवाहितेचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी पती, डॉक्टरांसह अन्य दोघांवर बदनापूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

गतवर्षी जिल्हा आरोग्य विभाग व चंदनझिरा पोलिसांनीजालना शहरातील ढवळेश्वर येथील डॉ. सतीश गवारे यांच्या क्लिनिकवर छापा टाकला होता. यावेळी जवळपास आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील एका विवाहितेचा ११ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे अवैधरीत्या गर्भपात करण्यात आला. त्यानंतर जास्त त्रास होऊ लागल्यामुळे तिला जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी याबाबत आरोग्य विभाग व पोलिसांना कळविले.
 

Web Title: Illegal Abortion in Jalna; Crime against four persons including husband