Student Death News: विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील एका खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. ही खोली होती धीरजची. पोलीस आल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा आतमध्ये २२ वर्षीय धीरजचा पंख्याला लटकलेला मृतदेह होता. मृतदेह सडू लागला होता. त्याची दुर्गंधी सुटली आणि नंतर धीरजची बातमी कुटुंबीयांना कळली. त्याच्या वडिलांच्या आक्रोशाने सगळेच हेलावून गेले. 'आयटीटी कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला', असे म्हणत त्यांनी टाहो फोडला.
धीरज सैनी (वय २२) मूळचा हरयाणाचा. तो उत्तर प्रदेशातील आयआयटी कानपूरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. अभ्यासक्रमाचे अंतिम वर्ष सुरू असतानाच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
धीरज अनेक दिवसांपासून खोलीतच होता
सहाय्यक पोलीस आयुक्त रंजित कुमार यांनी सांगितले की, 'धीरज हा वसतिगृहातील खोली क्रमांक १२३ मध्ये राहत होता. तो गेल्या अनेक दिवसांपासून खोलीतून बाहेरच पडला नव्हता. बुधवारी (१ ऑक्टोबर) त्याच्या खोलीतून वास येऊ लागला. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी धीरजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता.
पोलिसांनी सांगितले की, धीरजने मृत्युपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. धीरजने काही दिवसांपूर्वीच घरी सांगितलं होतं की, तो डिसेंबरमध्ये घरी येईल. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. जर तक्रार देण्यात आली, तर या प्रकरणाचा पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
"माझा मुलगा हिरा होता, आयआयटीने त्याला गिळलं"
धीरजच्या मृत्यूचा त्याच्या वडिलांना धक्का बसला आहे. त्याचे वडील सतीश सैनी हे मिठाईचे दुकान चालवतात. "आयआयटी कानपूरमध्ये माझ्या मुलाचा गिळलं. माझा मुलगा हिरा होता. मी सांगू शकत नाही की, त्याच्या शिक्षणासाठी मी किती कष्ट उपसले आहेत", असे पोलिसांना सांगताना सतीश सैनींच्या अश्रुंचा बांध फुटला.
बहिणीला कॉल केला, डिसेंबरमध्ये येणार होता घरी
सतीश सैनी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी शेवटचा कॉल केला होता. मोठ्या बहिणीशी तो बोलला होता. तो म्हणाला होता की, तो डिसेंबरमध्ये घरी येईल. मार्चपर्यंत कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळेल.
धीरज घरी गेला असेल म्हणून...
त्याच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, तो खूप शांत राहायचा. जास्त बोलत नव्हता. त्यामुळे सुरूवातीला तो दिसला नाही. त्यामुळे आम्हाला वाटलं की, तो घरी गेला असेल. त्यामुळे आम्ही त्याच्या खोलीकडे लक्ष दिलं नाही. पण, त्याच्या खोलीतून वास येऊ लागला. तोपर्यंत आमचं लक्षच त्याच्या खोलीकडे गेलं नाही.
Web Summary : IIT Kanpur student Dheeraj Saini, 22, found dead in his room. His father alleges IIT 'swallowed' his son, a bright engineering student. Foul odor led to the discovery. Police investigating; no suicide note found.
Web Summary : IIT कानपुर के छात्र धीरज सैनी, 22, अपने कमरे में मृत पाए गए। उनके पिता का आरोप है कि IIT ने उनके बेटे, एक प्रतिभाशाली इंजीनियरिंग छात्र को 'निगल' लिया। दुर्गंध आने पर पता चला। पुलिस जांच कर रही है; कोई सुसाइड नोट नहीं मिला।